कळंब – वॉटर संस्थेच्या स्थापना दिवस निमित्त दि.२० डिसेंबर २०२४ रोजी कळंब तालुक्यातील मंगरूळ येथे शेतकरी एकत्र जमून शेतातून जाणार्या नाल्यावर वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट व कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली श्रमदानातून वनराई बंधारा तयार करून वेगळा आदर्श निर्माण केला आहे. तालुक्यातील मंगरुळ येथे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी माने,उपविभागीय कृषी अधिकारी गुडूप, वॉटरशेड धाराशिव विभागाचे विभाग प्रमुख अभिजित कवठेकर, कळंब,कळंब तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे व वॉटरशेड संस्थेचे तालुका व्यवस्थापक अनिल वांढेकर, ग्राम विकास समिती अध्यक्ष राहुल काळे,सोशल ऑफिसर संदीप बारखडे, मनेश फंदे, इंजिनियर आशुतोष शिंदे, विशाल जाधव, सागर हाडे, प्रियदर्शनी कांबळे तसेच वसुंधरा सेवक,महिला प्रवर्तक त्याच बरोबर ग्रामविकास समिती अध्यक्ष राहुल काळे,शेतकरी आबासाहेब रितापुरे, धनंजय जाधव,अंकुश रितापुरे,प्रमोद रितापुरे,बाळासाहेब जाधव,शिरीष भराडे, अशोक बोदंरे, रामराजे रितापुरे, विद्या जाधव, किसकिंदा जाधव, काकासाहेब बोंदरे यांनी विशेष सहकार्य केले. परिसरातील शेतकरी यांच्या लोकसहभाग मधून वनराई बंधारा तयार करण्यात आला. सदर बंधारा साठी महिला व पुरुष शेतकरी यांनी टाकाऊ वस्तूपासून चार तास श्रमदानातुन हा बंधारा तयार केला. तयार केलेल्या बंधाऱ्यामुळे एकूण 132500 लिटर पाणी साठा तयार केला आहे. त्यामुळे यालगतच्या शेतकऱ्यांना गहू, ज्वारी व हरभरा या पीक संरक्षित पाणी, लागतच विहीरीची पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होईल, वनराई बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले