कळंब – कळंब नगर परिषद मुख्य अधिकारी व प्रशासक मंजुषा गुरमे यांचा कळंब येथील ज्येष्ठ नागरिकांनी नगरपरिषद कार्यालय येथे बुके देऊन सत्कार केला. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज आडसूळ,ज्येष्ठ विधीज्ञ त्र्यंबकराव मनगिरे,प्रकाश भडंगे,भास्करराव सोनवणे, विलासराव करंजकर,माधवसिंग राजपूत,सचिन क्षिरसागर, गुणवंत कामगार असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अच्युतराव माने,अँड.नितीन अंगरखे, कार्यालयीन अधीक्षक एल.एस वाघमारे,आस्थापना विभागाचे अजय काकडे यांची उपस्थिती होती. गुरमे यांनी याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकाकडून समस्या ऐकून घेतल्या तसेच जेष्ठासाठी विविध उपक्रम या विषयी चर्चा केली.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात