धाराशिव – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप-परिसर, धाराशिव येथे खादी महोत्सवाचे औचित्य साधून, विद्यार्थ्यांमध्ये खादी विषयी जागृती निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत जनजागृती पर कार्यक्रमाचे आयोजन उप परिसराचे संचालक डॉ. प्रशांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आले. या कार्यक्रमामध्ये डॉ.जितेंद्र शिंदे यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. यामध्ये डॉ.शिंदे यांनी खादी हा कपडा नसून एक विचार आहे.त्या विचारा मागची भूमिका आपल्या व्याख्यानातून विद्यार्थांना सांगितली. तसेच या कार्यक्रमाला कैलाश लटके,क्रीडा अधिकारी, धाराशिव यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनीही विद्यार्थांना मार्गदर्शन केले तर डॉ.राहुल खोब्रागडे हे अध्यक्षस्थानी होते. डॉ. मेघश्याम पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले व विद्यार्थ्यांना खादी महोत्सव निमित्य शपथ देण्यात आली. तसेच, विध्यार्थ्यांना इ-शपथ घेण्यासाठी सूचित करण्यात आले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप हा डॉ.राहुल खोब्रागडे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी केले. या कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व विद्यार्थी उपस्थितीत होते.
More Stories
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन