कळंब – तालुक्यातील मंगरूळ या आपल्या गावी सतीश दिनकर रितापुरे (वय 46) हे कामानिमित्त आले होते. काम झाल्यानंतर रितापुरे हे परत कामावर रुजू होण्यासाठी वडील दिनकर बाबासाहेब रितापुरे (वय 65) यांच्यासह दुचाकीवरुन बस स्थानकावर जात होते.( मंगरूळ फाट्यावर) दरम्यान, त्यांची दुचाकी आल्यानंतर ढोकी कडून कळंब कडे जाणाऱ्या एका कंटेनर चालकाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात रितापुरे बाप- लेकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनरने मोटर सायकलला 300 मीटर पर्यंत फरफटत नेले असून, कंटेनर चालक फरार झाला आहे. मयत सतीश रितापुरे हे उदगीर येथील एका शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. बाप- लेकाच्या मृत्यूमुळे मंगरूळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात