August 9, 2025

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मल्टीस्टेट कळंब शाखेचा वर्धापन दिन उत्साहात

  • कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मल्टी स्टेट को – ऑप. क्रेडिट सोसायटी लि. अरविंदनगर केशेगाव शाखा कळंब शाखेचा १२ वा वर्धापन दिन कार्यक्रमाचे सुनील मार्केट कळंब येथे दिनांक १३ नोव्हेंबर रोजी उत्साहात आनंदात साजरा करण्यात आला.
    याप्रसंगी प्रमुख उपस्थितात संस्थेचे चेअरमन ॲड.चित्राव अ .गोरे.धाराशिव जिल्हा ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विजेंद्र चव्हाण, हसेगांव ( केज ) माजी सरपंच विश्वंभर पाटील ज्येष्ठविज्ञ ॲड.दत्तात्रय पवार, सामाजिक कार्यकर्ते महंमद चाऊस , ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.उद्धवराव शेळके, धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे,सा.साक्षी पावनज्योत संपादक सुभाष घोडके ,माधवसिंग राजपूत ,प्रशांत पडवळ तसेच आंबेडकर मल्टीस्टेट चे महादेव बिडवे प्रशासन अधिकारी, अमोल पाटील जनरल मॅनेजर,
    सचिन भोसले बिझनेस डेव्हलपमेंट अधिकारी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी मल्टीस्टेटचे चेअरमन चित्राव गोरे यांनी मल्टीस्टेटच्या ५० शाखा असून खर्चात काटकसर करून सभासदांचे हित जोपासण्याचे काम संस्थापक चेअरमन अरविंद गोरे यांच्या विचारानुसार सुरू असून शेतकरी लघु व छोटे उद्योजक तसेच बचत गटातील महिलांना प्राधान्य प्रमाणे मल्टीस्टेट च्या माध्यमातून कर्ज पुरवठा केला जातो असे सांगून विश्वासहर्ता हीच ओळख हे ब्रीद घेऊन सातत्याने विकासाकडे घोडदौड चालू आहे असे सांगितले याप्रसंगी महिला बचत गटांच्या वतीने वतीने चेअरमन चित्राव गोरे यांचा महिला बचत गट यांच्यावतीने उपस्थित महिला गटातील अध्यक्ष ,सचिव यांनी बुके देऊन सत्कार केला करण्यात आला याप्रसंगी येडाई राष्ट्रमाता,सहेली,प्रगती, आलिशा,अंबिका,अरहान, आदीबा,तथागत आदी महिला बचत गटातील महिलांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्टीस्टेटचे कर्मचारी गणेश पवार, दर्शना तळ भंडारे, शरद कापरे ,सोनाली माने ,( बचत गट) सुनील जाधवर मार्केटिंग अधिकारी यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!