August 9, 2025

प्रत्येकाने तन मन धनाने संघटनेत सामील होऊन काम करावे – बोरीकर

  • कळंब – संघटनेचे कार्य करत असताना प्रत्येकाने तन मन धनाने संघटनेत सामील होऊन काम करावे असे प्रतिपादन
    मागासवर्गीय निवृत्त कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बोरीकर यांनी केले.
    दि.२ नोव्हेंबर २०२४ वार शनिवार रोजी यशवंत नगरातील लुबींनी बुद्ध विहारात मागासवर्गीय निवृत्त कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
    बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्य उपाध्यक्ष बोरीकर हे होते.
    अध्यक्षीय समारोप प्रसंगी त्यांनी सर्वांना योग्य मार्गदर्शन केले.
    या प्रसंगी संघाचे तालुकाध्यक्ष प्रा.तात्याराव वाघमारे,सचिव सुरेंद्र शीलवत,ताकपिरे,सुनिल गाडे,अजित शिरसाट,श्रीधर सावंत,बी.एन.शिलवंत उपस्थित होते.
    या बैठकीचे प्रास्ताविक मधुकर सावंत यांनी केले तर आभार श्रीधर सावंत यांनी मानले.
error: Content is protected !!