डिकसळ – मौजे डिकसळ येथील प्रभाग क्रं.४ येथील मेजर काळे यांचा खूप दिवसापासून खूप मोठा कचरा साचला होता. ग्रामपंचायत सदस्य इमरान मुल्ला,मोबीन मन्यार व रफिक सय्यद यांच्याशी संपर्क साधून मागणी केली या ग्रामपंचायत सदस्यांनी तात्काळ सरपंच ग्रामसेवक व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून कचरा उचलून नेण्याची विनंती केली. अन्यथा हाच कचरा ग्रामपंचायत च्या समोर आणून टाकू असे आवाहन देखील देण्यात आले होते. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही. या भागातील नागरिकांना याचा खूप मोठा त्रास होत होता हीच बाब लक्षात घेऊन दि.१ नोव्हेंबर २०२४ रोजी डिकसळ ग्रामपंचायत सदस्य इमरान मुल्ला,रफिक सय्यद व मुबीन मनियार यांनी हाच कचरा डिकसळ ग्रामपंचायतच्या समोर आणून टाकला आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात