धाराशिव – मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेवरून कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.यावेळी सोबत अतुल गायकवाड,बलराज रणदिवे,योगेश सोन्ने पाटील यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मनोज जरंगे पाटील हे येत्या दोन दिवसात उमेदवार निश्चित करणार असून उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात अनेक इच्छुक आहेत.या सर्व इच्छुकांनी एकत्र येत आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.त्यामध्येच धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या ठिकाणी उमेदवार कोण असणार याची उत्सुकता देखील शिगेला पोहचली आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य