कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक विलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विद्याभवन हायस्कूल येथे दिनांक ८ ऑक्टोबर रोजी इयत्ता दहावी अ चा माता पालक मेळावा पार पडला. विद्यार्थ्यांच्या यशात पालकांचा सहभाग सुद्धा खूप महत्त्वाचा असतो आम्ही शिक्षक व पालक यांच्यात सुसंवाद साधून विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन वर्गशिक्षिका श्रीमती राऊत ए.डी यांनी केले होते. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक पवार व्ही.एस,उपमुख्याध्यापक कुंभार व्ही.जी व पर्यवेक्षक मयाचारी व्ही.एस यांची प्रमुख उपस्थिती होते. याप्रसंगी पर्यवेक्षक विक्रम मायाचारी यांनी येणाऱ्या काळातील स्पर्धा व अभ्यासाचे नियोजन कसे करावे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले, श्रीमती कोळी जे.एन यांनी पालकांनी विद्यार्थ्यांसोबत मैत्रीपूर्ण राहिले तर मुलांचा सर्वांगीण विकास कसा होतो हे पटवून दिले व सोनके यांनी अभ्यास येणाऱ्या काळासाठी किती महत्त्वाचा आहे हे पटवून सांगितले. पवार डी.बी यांनी प्रश्नपत्रिकांचा सराव किती महत्त्वाचा आहे ते सांगितले. शेवटी आभार प्रदर्शनात वर्ग शिक्षिका श्रीमती राऊत एडी यांनी चालू काळात मोबाईल इंटरनेट पासून मुलांना दूर ठेवून शाळेची परंपरा कायम ठेवण्यास सांगून सर्व उपस्थित पालकांचे व सर्व उपस्थित शिक्षकांचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात