कळंब – धाराशिव जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय व कौतुकास्पद कार्य केल्याबद्दल कळंब तालुक्यातील गोविंदपुर येथील अनंतराव घोगरे पाटील जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन धाराशिव यांना राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र व जागृत नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या वतीने राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. कोल्हापूर येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार अनंतराव घोगरे यांना प्रदान करण्यात आला.पुरस्कार मिळाल्याबद्दल घोगरे यांचे राज्य गुणवंत कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश केसरकर व सचिव अच्युतराव माने,ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, उपाध्यक्ष राजाभाऊ आंधळे यांनी अभिनंदन केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात