कळंब – स्थानिक युवा वर्गाने शिवाजी कापसें यांच्या विधानसभा उमेदवारीस उत्स्फूर्त समर्थन दर्शवले आहे.कापसें यांचे नेतृत्व आणि सामाजिक योगदान यामुळे युवकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदर आणि प्रेम आहे. कापसें यांनी आपल्या नगराध्यक्ष,छत्रपती शिवाजी महाविद्यालय,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कार्यकाळात स्थानिक समुदायासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत,ज्यामुळे युवकांना प्रेरणा मिळाली आहे.त्यांच्या विजनमुळे युवांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत आणि त्यांचे कार्य युवा विकासासाठी महत्त्वाचे ठरले आहे. युवकांचा विश्वास आणि समर्थन मिळाल्यामुळे कापसें यांनी आगामी निवडणुकांत यश मिळवण्यास निश्चितपणे मदत होईल.त्यांच्या उमेदवारीमुळे स्थानिक विकास आणि युवा सशक्तीकरणाच्या दिशेने नवे पाऊल उचलले जाईल.अशी चर्चा तालुक्यातील विविध गावातील युवक हे बोलून दाखवत आहेत.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात