उमरगा – कॅशलेस व्हॉइसलीस,आणि क्रेडिट लेस अशा शेवटच्या उपेक्षित,महिलांच्या विकासासाठी आणिक फायनान्शिअल सर्व्हिसेस गेली बारा वर्षापासून कार्यरत आहे.भविष्य काळामध्ये आपल्याच गावातला पैसा आपल्याच लोकांच्या विकासासाठी कामी आणावा. यातून गरिबांच्या विकासाला मदत होईल आणि आपणासही चांगल्या पद्धतीचा व्याजदर मिळेल.त्यातून सामाजिक बदलासाठी आपला हातभार लागेल असे प्रतिपादन अनिक फायनान्शिअल सर्विसेसचे व्यवस्थापकीय संचालक विश्वनाथ तोडकर यांनी केले. अनिक फायनान्शिअल सर्विसेस आणि सावित्रीबाई फुले म्युचल बेनिफिट ट्रस्ट उमरगा या नवीन शाखेच्या कार्यालयाचा उद्घाटन सोहळा दि.२० ऑक्टोबर २०२४ रोजी पार पडला. याप्रसंगी ते विचार पिठावरून बोलत होते.या कार्यालय उद्घाटनच्या प्रसंग आणिक चे चेअरमन रमेश भिसे,उपाध्यक्ष बी.पी.सूर्यवंशी,प्रभात मल्टीस्टेटचे संचालक एम.डी पाटील ,हनुमान नागरी ग्रामीण बिगर शेतीसह सहकारी पतसंस्था मर्यादित मातोळाचे संचालक नानाराव भोसले, प्राचार्य अनिगुंठे,प्राचार्य गोविंद बिराजदार,समाज विकास संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विद्याताई वाघ,पर्याय संस्थेच्या संचालिका अनिताताई तोडकर, समाज विकास संस्थेचे कार्यवाह भूमिपुत्र वाघ,डॉ.कल्पना वाघ आदी मान्यवर आणि गुंतवणूकदार उपस्थित होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रोफेसर गोविंद बिराजदार होते. यावेळी भूमिपुत्र वाघ,व्यंकट अणिगुंटे,रमेश भिसे,बी.पी. सूर्यवंशी यांनी आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी ठेवीधारक आणि लाभधारक यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाखा व्यवस्थापक निखिलराजे वाघ यांनी केले तर सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले.कार्यक्रम आयोजनासाठी,विद्या मारकड,अफसाना मुल्ला,उमेश आबाचणे,संकेत लवटे,सोम अंतडं,मैलारी शिरोळे,आनंद गायकवाड,नितीन वाकळे,आकाश इंगळे अर्जव चौधरी,गोविंद कामले,रंजना यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाला गुड मॉर्निंग वॉकचे विशेष प्रतिनिधी सहभागी झाले होते.
More Stories
बसस्थानकाच्या बांधकामासाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक
उमरगा शहर व तालुक्यामध्ये वृक्ष लागवड
आरोग्य क्षेत्रात समाज विकास संस्थेचे कार्य उल्लेखनीय