कळंब (साक्षी पावनज्योत ) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी निजाम काळात बहुजनांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळवून देण्यासाठी १९५१ मध्ये शाळा सुरू केल्या.त्यांचा हा उपक्रम आजच्या काळातही महत्त्वाचा ठरतो,कारण त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन घडवले. मराठवाड्यात विविध ठिकाणी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा,महाविद्यालयानी अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या कार्यामुळे आज अनेक विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोचले आहेत. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींचे कार्य आजही प्रेरणादायक आहे आणि त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन आपल्याला समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणे आवश्यक आहे. दि.१७ ऑक्टोबर २०२४ रोजी कळंब शहरातील शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात गुरुजींच्या पुतळ्यास भारतीय जीवन बिमा निगम (एल.आय. सी)चे कळंब शाखा अधिकारी भारत चोरघडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. याप्रसंगी ज्ञान प्रसार मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,प्राचार्य डॉ.सुनिल पवार,सहाय्यक श्रीकांत तिखोने,प्रशासकीय अधिकारी असद खान,सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक डॉ.के.डी.जाधव,उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान,प्रा.नितीन अंकुशराव,प्रा.साहेबराव बोंदर,प्रा.शाहरूख शेख,सा. साक्षी पावनज्योत उपसंपादक अरविंद शिंदे,कार्यकारी संपादक अविनाश घोडके सह महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात