June 21, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.13 ऑक्टोंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 92 कारवाया करुन 71,400 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • बेंबळी पोलीस ठाणे:आरोपी नामे-रमेश जनक लोमटे, वय 35 वर्षे,रा. रुईभर ता. जि. धाराशिव हे दि.13.10.2024 रोजी 18.15 वा. सु. हॉटेल राजगड समोर असलेल्या पाटलाच्या ढाबा मध्ये रुईभर येथे अंदाजे 2,030 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 29 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे:आरोपी नामे-शिवाजी नामदेव सास्तुरे, वय 37 वर्षे,रा. धाकटेवाडी ता.उमरगा जि. धाराशिव हे दि.13.10.2024 रोजी 17.30 वा. सु. तलमोड आर.टी.ओ चेक पोस्ट समोर साई टी हाउस पानटपरी समोर अंदाजे 6,880 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 84 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-शिवराज काशीनाथ गुंडरे, वय 23 वर्षे,रा. धाकटेवाडी ता.उमरगा जि. धाराशिव हे दि.13.10.2024 रोजी 20.15 वा. सु. इंदीरा चौक ते तुरोरी कडे जाणारे रोडलगत अंदाजे 15,320 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 89 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • शिराढोण पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान शिराढोण पोलीसांनी दि.13.10.2024 रोजी 13.40 वा. सु.शिराढोण पो ठाणे हद्दीत मारोतराव घोगरे यांचे शेतात जवळा खुर्द ते जवळा पाटीकडे जाणारे रोडलगत छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-भाउसाहेब बापूसाहेब देशमुख, वय 62 वर्षे, सोबत आठ इसम रा. जवळ खुर्द ता. कळंब जि. धाराशिव हे 13.40 वा. सु. मारोतराव घोगरे यांचे शेतात जवळा खुर्द ते जवळा पाटीकडे जाणारे रोडलगत तिरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 3,510 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले कळंब पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये शिराढोण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
  • उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे-ईस्माईल रज्जाक बागवान, वय 29 वर्षे, रा. खडक हनुमान मंदीर भोळेवाली गल्ली लातुर जि. लातुर यांनी दि.13.10.2024 रोजी 13.15 वा. सु. आपल्या ताब्यातील फळगाडा हा एन एच 65 रोडलगत विश्व लॉज समोर उमरगा येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना उमरगा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देवून वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • कळंब पोलीस ठाणे : दि.13.10.2024 रोजी 06.25 वा.सु.केज कळंब येणाऱ्या माजंरा पुलाजवळ रोडवर कळंब शिवार येथे अशोक लिलॅन्ड दोस्त वाहन क्र एमएच 45 ए.एफ 5185 चा चालक आरोपी नामे-इम्रान अब्दुल गफार, वय 35 वर्षे, रा. नेकनुर ता.जि. बीड यांनी त्याचे ताब्यातील वाहना मध्ये 5 जर्शी गायी दाटीवाटीने कोंबून निर्दयतेने जनावरांचे सुरक्षीततेची खबरदारी न घेता दोरीने आवळून बांधून जनावरे कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतुक करीत असताना येरमाळा पो. ठाणेच्या पथकास मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(अ) (1), 5(अ) (2), 5(ब) महाराष्ट्र पशु अधिनियम कलम 3, 11(1), (डी) (एफ)(आय-आय),(के) सह मपोका कलम 119,83 म.पो.अ.177,181, 3(1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • शिराढोण पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-सुनिल गोकुळ कांबळे, वय 28 वर्षे, रा.गौरेगाव ता. कळंब जि.धाराशिव यांची अंदाजे 50,000₹ किंमतीची काळ्या व लाल रंगाचे पट्टे असलेली बजाज प्लसर मोटरसायकल क्र एमएच 25ए.व्ही. 2059 ही दि. 11.10.2024 रोजी 11.00 गोविंदपुर येथील बसस्थानक लगत असलेल्या मातोश्री जनरल स्टोअर्स समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुनिल कांबळे यांनी दि.13.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303( 2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • ढोकी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-रुपेश पांडुरंग होगले, वय 25 वर्षे, रा. कसबे तडवळा ता. कळंब जि.धाराशिव यांचा अंदाजे 5,5,000₹ किंमतीचा स्वराज कंपनीचा एमएच 25 एएल 7417 ट्रॅक्टर हेड हा दि.13.10.2024 रोजी 00.54 वा. पुर्वी कसबे तडवळे येथील बसस्थानकाच्या पाठीमागील पत्र्याचे शेडमधून आरोपी नामे-कालिफनाथ नानासाहेब बागल,रा. शिंगोली ता. कळंब जि.धाराशिव ह.मु. कसबे तडवळे ता. कळंब जि. धाराशिव यांनी चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रुपेश होगले यांनी दि.13.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303( 2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तसेच फिर्यादीने दिलेल्या माहिती वरुन ढोकी पोलीसांनी आरोपी नामे-कालिफनाथ नानासाहेब बागल,रा. शिंगोली ता. कळंब जि.धाराशिव ह.मु. कसबे तडवळे ता. कळंब जि. धाराशिव यास ताब्यात घेवून सदर गुन्ह्या संदर्भात चौकशी केली असता नमुद आरोपीने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील तपास सुरु आहे.
  • “ मारहाण.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे-निखील राजेंद्र मोरे, विजय राजेंद्र मोरे दोघे रा. गोरमाळे ता. बार्शी जि. सोलापूर यांनी दि.13.10.2024 रोजी 07.30 वा. सु. आपसिंगा रोडलगत असलेल्या ब्रीज जवळ फिर्यादी नामे-अक्षय महादेव शिंदे, वय 27 रा.गोरमाळे ता. बार्शी जि. सोलापूर हे तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी आले असता नमुद आरोपींनी मागील भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, बेल्ट व कड्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अक्षय शिंदे यांनी दि.13.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1),115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे-अमोल शिवाजी दिवटे,रा. पांगरी ता. बार्शी यांनी दि.13.10.2024 रोजी 13.00 वा. सु. येडेश्वरी देवी मंदीर परिसरात श्रीनिवास बारचे बाजूला येरमाळा येथे फिर्यादी नामे-रामलिंग उध्दव दिवटे, वय 46 वर्षे, रा. पांगरी ता. बार्शी जि. सोलापूर यांना नमुद आरोपीने “ तु आजोबाच्या बकऱ्याच्या कार्यक्रमास का आलास” असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अक्षय शिंदे यांनी दि.13.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1),115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • ढोकी पोलीस ठाणे :आरोपी नामे-महमद शेख, सैफुल महामुद शेख, आसिफ महामुद शेख, रा. ईर्ला ता. जि. धाराशिव यांनी दि.13.10.2024 रोजी 08.30 ते 09.00 वा. सु. ईर्ला शेत शिवारातील शेत गट नं 25 मध्ये फिर्यादी नामे-भुजंग नारायण चौरे, वय 50 रा.ईर्ला ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी बांधाबरोबर सोयाबीन का फवारले असे विचारण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठी व हातोड्याने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-भुजंग चौरे यांनी दि.13.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1),115, 324 (2,6), 352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • तामलवाडी पोलीस ठाणे :आरोपी नामे-विनायक दादाराव पवार, विश्वजीत दादाराव पवार, विक्रम दादाराव पवार रा. तामलवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.13.10.2024 रोजी 13.30 वा. सु. तामलवाडी शिवारातील दादाराव पवार यांचे शेतातील बांधावरुन ओड्याकडे जात असताना फिर्यादी नामे-परमेश्वर बाळू बनसोडे, वय 39 रा. तामलवाडी जि. धाराशिव यांचा मुलगा राजरत्न व भाच्चा आदर्श यांना नमुद आरोपींनी शेतातील बांधावरुन जाण्याचे कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, ड्रीपच्या पाईपाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-परमेश्वर बनसोडे यांनी दि.13.10.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 352, 126(2), 3(5) सह अ.जा.ज.अ.प्र.कायदा कलम 3(1) (आर), 3(1)(एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!