धाराशिव (जिमाका) – जिल्हयातील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या मुला-मुलींच्या २ शासकिय वसतिगृहांच्या इमारतीचे लोकार्पण केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज ९ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले.अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर प्रमुख अतिथी म्हणून इतर मागास बहुजन कल्याण तथा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांची उपस्थिती होती. धाराशिव जिल्हयातील मुलां-मुलीच्या वसतिगृहाचे लोकार्पण कार्यक्रमाला इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक बी.जी.अरवत यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी विद्यार्थी व पालक तसेच इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला