June 22, 2025

विरंगुळा संविधान सन्मान सम्मेलन..!

  • ( विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा परिसरातील बागेतील कठ्ठ्यावर सामाजिक कार्यकर्ते नवनाथ,शेतकरी महादेव दादा, बांधकाम मिस्त्री किशन,विद्यार्थी मिलिंद यांच्यात छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या कर्मभूमीत संपन्न झालेल्या संविधान सन्मान संमेलनावर चर्चा सुरू असते)
  • नवनाथ – राम..राम..दादा..! या.. या.. कसं काय येणं केलं..!
  • महादेव – राम..राम..कार्यकर्ते.. आवं तुम्ही इंथ असताल म्हणून मिस्त्रीला घेऊन आलो होतो. तुमच्याबरोबर घडीभर बसलं मंजी डोकं ठिकाणावर येतंय बघा..!
  • किशन – होय..होय.. कार्यकर्ते..! तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळतंय म्हणून मिलिंदला पण् आम्ही सोबत आणलंय बघा..!
  • मिलिंद – काल साक्षी पावनज्योत मध्ये कोल्हापूरच्या संविधान सन्मान संमेलनाची बातमी होती.त्या संमेलनात तुम्ही पण असल्याचा उल्लेख होता म्हणून तुम्हाला भेटायची उत्सुकता होती.कॉलेजला जाता – जाता दादा सोबत मी पण आलो.तुमच्या भेटीसाठी सर..!
  • नवनाथ – अहो दादा..! तुम्ही यायला हवं होतं पण् तुमच्या शेतातील सोयाबीन काढणीचा राडा सुरू होता म्हणून मी तुम्हाला चला सुद्धा म्हटलं नाही.
  • महादेव – होय..होय..! कार्यकर्ते..! सोयाबीन काढणी सुरू असल्यामुळे तुमची भेट घेता आली नाही. तरी सुद्धा तुम्ही म्हणला असता तर मी सोयाबीन काढणी तसीच ठेवून आलो असतो. शाहू महाराजांच्या कर्मभूमीत.
  • मिलिंद – सर..! मला यायचं होतं परंतु तुम्ही जाणार आहात म्हणून माहित पडलं नाही व आपली ओळख पण नव्हती..! इथून पुढे संविधान जनजागृतीच्या कार्यक्रमासाठी मला बोलवा मी माझ्या मित्रासह आवश्यक येईन..!
  • महादेव – कसा झाला कार्यक्रम… आमच्या वारकरी सांप्रदायाचं काही होतं का ..? नुसतं संविधानाचं होतं ? कार्यकर्ते..!
  • नवनाथ – अहो…दादा..! संत ज्ञानेश्वर माऊली,संत तुकाराम, नरहरी महाराज,संत रोहिदास, सुफी संत अब्दुल कदिर अल गिलानी,शेख महम्मद महाराज, संत एकनाथ महाराज,संत सोयराबाई,संत चोखामेळा, संत गोरोबा कुंभार,संत सावता महाराज,संत नामदेव महाराज, संत जनाबाई,संत बहिणाबाई शिवूरकर आदी संत महात्म्यांच्या अभंगा सहित प्रतिमा असलेले मोठे-मोठे कट आऊट लावले होते.
  • महादेव – हे सगळं ऐकून लंय भारी वाटलं बघा… कार्यकर्ते..! तुमची भेट झाली मंजी लंय महत्वाचं ऐकायला मिळतं आणि जीवन जगण्यास संजिवनी मिळते बघा..! बरं… यतो मी… शेतात जावं लागेल…जनावरांना वैरण-पाणी करायचं हाय..!
  • राम…राम..!
  • समाप्त
error: Content is protected !!