धाराशिव – राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे राज्य सरचिटणीस अनिल नाचपले यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव जिल्हा शाखेची सभा शासकीय विश्रामगृह धाराशिव येथे संपन्न झाली. प्रथम सर्व महापुरुषांच्या एकत्रित प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.त्यानंतर मान्यवरांचा धाराशिव शाखेच्या वतीने सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र भर कर्मचारी अधिकारी शाखेच्या आढावा सभा व कर्मचारी अधिकारी जोडो अभियान सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आजची धाराशिवची सभा संपन्न झाली असल्याचे राज्य उपाध्यक्ष सुखदेव भालेकर यांनी स्पष्ट केले. या सभेमध्ये दि. 19 नोव्हेंबर 2023 रोजी होणाऱ्या शेगाव येथील राज्य अधिवेशना संदर्भात चर्चा करून नियोजन करण्यात आले. काही नवीन जिल्हा तथा तालुका कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करून संघटना विस्तार करण्यात आला. सद्यस्थितीतील ओबीसी कर्मचारी अधिकाऱ्यांचे प्रश्न व संविधानिक मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी येणाऱ्या 19 नोव्हेंबर 2023 रोजी सर्व कर्मचारी अधिकारी वर्गांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले. या पहिल्या भव्य अधिवेशनास धाराशिव जिल्ह्यातून जास्तीत जास्त कर्मचारी अधिकारी उपस्थित राहतील असे आश्वासन जिल्हाध्यक्ष संतोष भोजने यांनी दिले.ओबीसीच्या विविध प्रश्नांवर पदाधिकारी यांनी आपले मते मांडले व ओबीसी एकतेचा नारा मजबूत करणेचा निर्धार केला. या सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य उपाध्यक्ष सुखदेव भालेकर, राज्य समन्वयक विजयकुमार पिनाटे, लातूर जिल्हा महिला अध्यक्ष रेखा सुडे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष लक्ष्मण दावणकर ,धाराशिव जिल्हा अध्यक्ष संतोष भोजने यांच्या सह जिल्ह्यातील असंख्य कर्मचारी अधिकारी व संघटनेचे जिल्हा तालुका पदाधिकारी उपस्थित होते. या आढावा बैठकीत नविन पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ धाराशिव च्या वतीने राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल दिपक जाधव यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा प्रवक्ता पंकज कासार काटकर,जिल्हा उपाध्यक्ष संजय क्षिरसागर, सचिन राऊत,विशाल जाधव,आबासाहेब माळी,दयानंद जवळगावकर तर मच्छिंद्र बोकडे तालुका अध्यक्ष लोहारा,भास्कर कांबळे तालुकाध्यक्ष कळंब, सखाराम शिंदे वाशी तालुकाध्यक्ष ,बालाजी माळी तालुका अध्यक्ष तुळजापूर,शिशुपाल पुरी तालुका कार्याध्यक्ष वाशी , शिवशंकर राऊत तालुका सरचिटणिस वाशी ,मनोज पंडित यांची निवड करण्यात आली.या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष भोजने तर आभार सुखदेव भालेकर यांनी मांडले.बैठकीची सांगता “जय ओबीसी ,जय संविधान ” या घोषणेनी केली गेली. बैठकीसाठी बिभिषण हजारे,राजेंद्र लोहार,भास्कर कांबळे,माळी ए.एम,बोकडे एम.व्ही.,शंकर गोरे,मनोज पंडीत,बालाजी माळी,दयानंद जवळगावकर,सोमनाथ जामगावकर,बापु काळे,पुरुषोत्तम म्हेत्रै, वनवे डी.एच,विशाल जाधव,विजय घोळवे, विनायक आगलावे,जाधवर सतिश,शिंदे सखाराम,शिशुपाल पुरी,क्षिरसागर धनंजय,शिवशंकर राऊत,हराळे भगवान,मर्डे रमेश,थोरात पी.एम.सचिन राऊत या पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
More Stories
बजरंग ताटे जिल्हास्तरीय आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानित
कळंबचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांच्यासह पवार,माळी पुरस्काराने सन्मानित..!
कळंब येथे ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पालावर रक्षाबंधन