March 26, 2026

पात्र महिलांनी बँक खाते आधार संलग्न करावे

  • धाराशिव (जिमाका) – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा व कुटूंबातील त्यांची निर्णयक भूमिका मजबूत करण्यासाठी राज्य शासनाने “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना सुरु केली आहे.
    या योजनेसाठी ज्या पात्र महिला लाभार्थी आहेत,परंतु त्या पात्र महिला लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करणे प्रलंबित आहे,अशा पात्र महिला लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करून घेण्यासाठी जिल्हयातील सर्व संबंधित बँकामध्ये आधार संलग्न करुन घेण्यासाठी ७ व ८ ऑक्टोंबर २०२४ रोजी सोमवार व मंगळवार या दिवशी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
    जिल्हयातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यानी त्यांचे बैंक खाते आधार संलग्न करुन घेणे प्रलंबित आहे,अशा सर्व पात्र महिला लाभार्थ्यानी त्यांचे बँक खाते ज्या बँकेमध्ये आहे,त्या बँकेत स्वतः जाऊन आपले स्वतःचे आधारकार्ड बैंक खात्याशी जोडण्याची प्रक्रिया लवकरात लवकर करुन घ्यावी.जेणेकरुन या योजनेचा लाभ पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी मदत होईल.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
error: Content is protected !!