February 9, 2026

नेशन बिल्डर पुरस्काराचे थाटात वितरण

  • कळंब – रोटरी क्लबच्या नेशन बिल्डर अवार्ड सोहळा थाटात पार पडला.शिक्षणाशिवाय सुंदर आणि स्वच्छ समाजाची कल्पना करता येत नाही.समाज शिक्षित करण्यासाठी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे.व त्यांचा सन्मान करणे हे आपले हे आपले कर्तव्य आहे.०५ सप्टेंबर हा सिक्षक दिन आसतो त्यानिमित्ताने दरवर्षी रोटरी क्लब दरवर्षी इनोव्हेटिव काम करणाऱ्या शिक्षक बंधूना नेशन बिल्डर अवार्ड देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करत आसते.
    या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर डिस्ट्रिक्ट ३१३२ चे डीजीई रो.सुधीर लातूरे,एजी रो.गणेश मुळे व उपशिक्षाधिकारी माध्य. धाराशिवचे दत्तात्रय लांडगे , रोटरी क्लबचे अध्यक्ष रो.अरविंद शिंदे,सचिव रो.अशोक काटे उपस्थित होते. या पुरस्काराचे मानकरी संजय गोकुळ हिंगमिरे, शहाजी दगडू बनसोडे,अखबर चांदपाशा शेख,अमोल दत्तात्रय चव्हाण,सुधीर मुरलीधर भंवर,सुनीता भागवत गुंड या सहा शिक्षकाचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र,शाल व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.याप्रसंगी बोलताना सुधीर लातूरे महानले की,शिक्षक हेच खरे देशाचे आधारस्तंभ आहेत.काही वर्षापूर्वी रोटरी क्लब ने पोलिओ निर्मुलन करण्याचा वसा घेऊन त्यादृष्टीने काम केले व आज आपण पाहतो की संपूर्ण जग पोलिओ मुक्त झालेले आहे.त्याच पद्धतिने साक्षरता अभियान राबवण्याचे रोटरी क्लब ने ठरवले आहे.तसेच दत्तात्रय लांडगे साहेब बोलताना म्हणाले की,रोटरी क्लब समाजोपयोगी विविध उपक्रम हाती घेत आसते.या कळंब शाखेच्या वतीने सुद्धा शैक्षणिक काम करणाऱ्या होतकरू शिक्षकांना प्रेरणा देण्याचे काम या पुरकाराच्या माध्यमातून त्यांनी केले हे फार आनंददायी काम आहे.या कार्यक्रमाचे औचित्य साधून विविध उपक्रमामध्ये पारितोषिक घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.त्यामध्ये सामान्यज्ञान स्पर्धा परीक्षा,चित्रकला स्पर्धा,बॅडमेंटन स्मॅस स्पर्धा व कळंबमधील उत्कृष्ट गणेश देखावा सादरीकरण मधील विजेते.
    या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो.सुशील तीर्थकर यांनी केले तर आभार प्रदर्शन रो.संजय घुले यांनी मांडले तसेच प्रो.चेरमन म्हणून प्रा.संजय सावंत,रो.श्रीकांत कळंबकर,रो.बालाजी जाधव यांनी काम पाहिले. कार्यक्रमासाठी सर्व रोटारियन्स व कळंबमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!