धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.28 सप्टेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 69 कारवाया करुन 98,950 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
ढोकी पोलीस ठाणे: आरोपी नामे-सतिश शहाजी थोरात, वय 32 वर्षे, रा. दाउतपूर ता. जि. धाराशिव हे दि 28.09.2024 रोजी 16.30 वा. सु. पत्र्याचे शेडसमोर दाउतपूर अंदाजे 7,000 ₹ किंमतीची 100 लि. गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या 5 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
नळदुर्ग पोलीस ठाणे: आरोपी नामे-जाफर अमीर शेख, वय 32 वर्षे, रा. सिंदगाव ता.तुळजापूर जि. धाराशिव हे दि 28.09.2024 रोजी 13.30 वा. सु. आपल्या पत्र्याचे शेडसमोर अंदाजे 1,020 ₹ किंमतीची 15 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-लक्ष्मण तानाजी शिंदे, वय 38 वर्षे, रा. सिंदगाव ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि 28.09.2024 रोजी 13.00 वा. सु. आरोपीच्या पत्र्याचे शेडमध्ये अंदाजे 875 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 25 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
“ जुगार विरोधी कारवाई.”
तुळजापूर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान तुळजापूर पोलीसांनी दि.28.09.2024 रोजी 16.15 वा. सु. तुळजापूर पो ठाणे हद्दीत हॉटेल पीजच्या पाठीमागे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-बालाजी बाबुराव ढवण,रा. तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 16.15 वा. सु. हॉटेल पीजच्या पाठीमागे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,350 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले तुळजापूर पो. ठाणेच्या पथकास आढळले.यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान लोहारा पोलीसांनी दि.28.09.2024 रोजी 18.00 वा. सु. लोहारा पो ठाणे हद्दीत पेठसांगवी येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-फारुक जिलनी शेख, वय 28 रा.पेठसांगवी ता. उमरगा जि. धाराशिव हे 18.00 वा. सु. पेठसांगवी येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 840 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले लोहारा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
परंडा पोलीस ठाणे :आरोपी नामे-विश्वनाथ गोविंद लवटे, वय 27 वर्षे, रा.कोरेगाववाडी ता.उमरगा जि. धाराशिव हे दि.28.09.2024 रोजी 19.00 वा. सु. आपल्या ताब्यातील ट्रक क्र एमएच 13 सीयु 9633 ही नायरा पेट्रोल पंपासमोर रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द परंडा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
बेंबळी पोलीस ठाणे: फिर्यादी नामे- प्रथमेश बालाजी मुंडे, वय 21 वर्षे, रा.विठ्ठलवाडी ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीची म्हैस व शेजारचे सागर बबन शिंदे यांची 30,000₹ किंमतीची म्हैस या दि.26.09.2024 रोजी 19.00 ते दि. 27.09.2024 रोजी 05.30 वा. सु. प्रथमेश मुंडे यांचे शेतातु अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रथमेस मुंडे यांनी दि.28.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
मुरुम पोलीस ठाणे :आरोपी नामे-एकनाथ जगन्नाथ बचाटे, रा.काटगाव ता.तुळजापूर ह.मु.आष्टामोड ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.26.09.2024 रोजी 15.30 वा. सु.श्री संत महाराज कानेगावकर प्रा.आश्रमशाळा भोसगा येथे फिर्यादी नामे-चंद्रकांत रामा बनसोडे, वय 74 वर्षे, रा.आष्टाकासार ता. लोहारा जि. धाराशिव हे संस्थेचे सचिव असल्याने नमुद आरोपींने आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी तोंडावर मारहाण करुन फॅक्चर केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- चंद्रकांत बनसोडे यांनी दि.28.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 117( 2), 115(2), 352, 351(2) (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे-सर्जेराव निवृत्ती ढाकणे, दिलीप सर्जेराव ढाकणे, मुक्ता सर्जेराव ढाकणे, सर्व रा. पारा ता. वाशी जि.धाराशिव यांनी दि.28.09.2024 रोजी 17.00 वा. सु. पारा शिवारातील शेत गट नं 316 मध्ये फिर्यादी नामे-बालाजी मंचीक ढाकणे, वय 29 वर्षे, रा. पारा ता.वाशी जि. धाराशिव यांना व त्यांची आई व भाउ यांना नमुद आरोपीने बैल शेतात जाण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, चाबुक व औताचे रुमन्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बालाजी ढाकणे यांनी दि.28.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
रस्ता अपघात.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे: मयत नामे-कुमार मिट्टू तोडासे, वय 50 वर्षे, रा. रामलिंग नगर खारीक खोबरे वस्ती येडशी ता. जि. धाराशिव या दि.18.09.2024 रोजी 17.15 वा. सु. येडशी येथे हायवेवर लोखंडी ब्रिजचे जवळ रोड येथुन पायी जात होते. दरम्यान कार क्र एमएच 25 आर 8626 चा चालक आरोपी नामे-प्रविण बाबुराव होळे, रा. प्रेरणानगर फावडे कॉम्पलेक्सचे पाठीमागे भानुनगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील कार ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून कुमार तोडासे यांन पाठीमागून धडक दिली. या अपघातात कुमार तोडासे हे गंभीर जखमी होवून मयत झाले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राहुल कुमार तोडासे, वय 19 वर्षे, रा. माळीवाडा गोंडवाडा वस्ती ता.जि. छत्रपती संभाजीनगर ह.मु. रामलिंग नगर खारीक खोबरे वस्ती येडशी ता.जि. धाराशिव यांनी दि.28.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1) सह मोवाका कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ फसवणुक.”
परंडा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- सुजितसिंह मानसिंह ठाकुर, वय 57 वर्षे, रा.राजापूर गल्ली परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांचा मोबाईल नंबर 9403490000 यावर मोबाईल क्र 911412820074 चा धाराकाने दि. 24.07.2024 रोजी 21.31 वा. सु. फोन करुन आपल्या खात्यावरुन 4,490 ₹ ट्रान्सफर व्यवहार केला नसल्यास 1 बटन दाबावे त्याप्रमाणे सुजितसिंह ठाकुर यांनी 1 हे बटन दाबल्याने सुजितसिंह ठाकुर यांचे बॅक खात्यातुन दि. 20.08.2024 रोजी एकुण 19,969 ₹ बॅक खात्यातुन ऑनलाईन काढून घेवून फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुजितसिंह ठाकुर यांनी दि.28.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 318(4) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66(डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
बँकांनी पिक कर्जासह अन्य योजनांसाठी कर्ज वेळेत उपलब्ध करुन द्यावेत – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार
मनाने मोठे… दिलदार मनाचे… संवेदनशील व्यक्तिमत्त्व-डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील