कळंब (महेश फाटक) – नांदेड येथे झालेल्या विभागीय विविध क्रिडा स्पर्धेत छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय कळंब येथील विद्यार्थी आदित्य संजय पुजारी याने विभागीय आर्चरी कंपाऊंड या क्रिडा प्रकारामध्ये विभागातून प्रथम क्रमांक पटकावला तसेच संकेत दत्तात्रय गाडेकर याने द्वितीय क्रमांक पटकावला यासाठी त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.वरिष्ठ महाविद्यालयातील पैलवान प्रेम राजेंद्र पवार याने परंडा येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला त्याची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाली.कु.मयुरी संतोष लांडगे हिची जिल्हास्तरीय बॅटमिंटन स्पर्धेत निवड झाली.तसेच तालुका स्तरीय स्पर्धेत श्रावणी संतोष उबाळे याने गोळाफेक मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. राजनंदिनी रविंद्र बाराते याने चारशे मीटर धावणे स्पर्धेत तृतीय क्र. पटकावला व आदित्य संजय आडसूळ याने थाळीफेक व भालाफेक यामध्ये तृतीय क्र. पटकावला.या विविध क्रिडा स्पर्धेमध्ये छ.शिवाजी महाविद्यालयाने सहभाग नोंदवून विविध क्रिडा प्रकारामध्ये यश संपादन केले.या सर्व विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये यश संपादन केल्याबद्दल संस्थेच्या वतीने विजयी खेळाडूंचे शाल पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.या यशाबद्दल संस्थेच्या वतीने संस्थेचे सचिव शिवाजी कापसे, अध्यक्ष श्याम खबाले,उपाध्यक्ष प्रा.अविनाश मोरे,सहसचिव प्रा.संजय घुले व कोषाध्यक्ष बाळकृष्ण गुरसाळे, प्राचार्य.शशिकांत जाधवर व प्रा.शिव खबाले,प्रा.राजाभाऊ चोरघडे व प्रा.नामदेव तोडकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विजयी स्पर्धकांचे अभिनंदन केले. प्रा.शिव खबाले,प्रा.चोरघडे व प्रा.तोडकर यानी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.चोरघडे यांनी केले व आभार डॉ.हनुमंत माने यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले.
More Stories
ग्रामीण शिक्षणाचा प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे