September 21, 2026

शहरात परंपरागत वाद्य वाजवीत गणेश विसर्जन मिरवणुका

  • कळंब (माधवसिंग राजपूत ) – शहरात विविध गणेश मंडळांनी ढोल,ताशा,तशेच सनई वाद्य वाजवीत कळंब शहरात मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकीत कळंब येथील ज्येष्ठ नागरिक तसेच पोलीस प्रशासनाने डीजे डॉल्बीमुक्त कळंब ही संकल्पना घेऊन जनजागृती केली होती. याचा चांगला परिणाम दिसून आला. कळंब शहरात १९ सार्वजनिक गणेश मंडळाने श्री गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती.या मंडळांनी परंपरागत वाद्याचा वाजवीत मिरवणुका काढल्या सकाळी ११ वाजता मिरवणुकाना सुरुवात झाली. रात्री दहा वाजेपर्यंत या मिरवणुका सुरू राहिल्या. व्यंकटेश मंडळाच्या मिरवणुकीत तेर येथील वारकरी शिक्षण संस्थेतील बाल वारकरी यांनी सहभाग घेतला मृदंगाच्या व टाळाच्या ठेक्यात भजन गायन करीत नृत्य सादर केले.या बाल वारकऱ्या बरोबरच गणेश मंडळातील पदाधिकाऱ्यांनी फेटा,धोतर व सदरा हा परंपरागत वेश परिधान केला होता. या मंडळाच्या मिरवणुकीस कळंब उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार,पोलीस निरीक्षक रवी सानप,ज्येष्ठ नागरिक महासंघाचे महादेव महाराज अडसूळ, प्रकाश भडंगे यांनी भेट दिली.
    याप्रसंगी गणेश मंडळ मार्गदर्शक संजय मालपाणी,अध्यक्ष गुरसाळे यांचा सत्कार केला तर छत्रपती शिवाजी चौक येथे तुळजापूरचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी श्री चे दर्शन घेतले. याप्रसंगी मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याचबरोबर महसूल कॉलनी येथील महिला मंडळ श्री गणेशाची मिरवणूक मित्र कामगार गणेश मंडळ,शिव सेवा तालीम संघ,धर्मवीर संभाजी महाराज गणेश मंडळ, नवयुवक,गणेश मंडळ,श्री शंकर गणेश मंडळ ,श्री शिवशंकर गणेश मंडळ,शहीद भगतसिंग गणेश मंडळ,सह्योग गणेश मंडळ,भोई राजा गणेश मंडळ या मंडळाच्या थाटात मिरवणुका काढण्यात आल्या. मांजरा नदी काठ येथे मोठ्या उंच आकाराच्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती. तर कळंब नगर परिषदेच्या वतीने छोट्या आकाराच्या तसेच घरातील गणेश मूर्ती संकलन, छोटा हत्ती द्वारे व विसर्जन ,व्यवस्थेसाठी पाणीपुरवठा ,अग्निशामन,विद्युत विभागाची टीम सेवेत होती. यासाठी कार्यालयीन अधीक्षक एल.एस.वाघमारे,संजय हाजगुडे, शिवाजी केंद्रे,चोंदे यांचा समावेश होता तर पोलीस विभागाच्या वतीने पोलीस निरीक्षक रवी सानप,सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत कांबळे ,उपनिरीक्षक रामहरी चाटे पिलंगवाड,स्थानिक गुन्हा शाखेचे श्रीराम मायंदे यांच्यासह ४८ पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांचा बंदोबस्त होता.

error: Content is protected !!