February 12, 2026

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.10 सप्टेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 236 कारवाया करुन 1,90,600 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई .”
  • मा.पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल मंगळवारी दि.10.09.2024 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 16 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला सुमारे 150 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव, 365 लि. गावठी दारु, सिंधी ताडी अम्ली द्रव 18 लि. व देशी विदेशी दारुच्या 240 सिलबंद बाटल्या असे मद्य जप्त करण्यात आले. सदर मद्य जप्त करुन त्यांची एकत्रीत किंमत अंदाजे 58,285 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 16 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
  • 1)धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-आयुब मलंग तोबोळी, वय 47 वर्षे, वर्षे, रा वैरागनाका फकीरा नगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे 13.30 वा. सु. बौध्दनगर धाराशिव येथे अंदाजे 11,880 ₹ किंमतीची 198 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली. आरोपी नामे-अमर किसन चव्हाण, वय 41 वर्षे, रा पापनाश नगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे 17.45 वा. सु. पापनाश नगर धाराशिव येथे अंदाजे 3,500 ₹ किंमतीची 35 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
  • 2)धाराशिव ग्रामीण पो. ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले.आरोपी नामे- चंद्रकांत तुकय्या भंडारी, वय 40 वर्षे, रा. वैरागननाका फकीरानगर धाराशिव ता.जि. धाराशिव हे 14.10 वा. सु. शिंदेवाडी शिवारातील पिराज मंजुळे यांचे शेतात अंदाजे 1,480 ₹ किंमतीची 18 लि. सिंधी ताडी अम्ली द्रव जप्त करण्यात आले. आरोपी नामे-सचिन चंद्रसेन उमाप, रा. सारोळा ता. जि. धाराशिव हे 18.30 वा. सु. जगदंबा हॉटेल चे बाजूस बावी येथे अंदाजे 935 ₹ किंमतीची 10 लि. गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या 9 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
  • 3)अंबी पो. ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले.आरोपी नामे- हिंदुराव वसंतराव खर्डे, वय 37 वर्षे, रा. वाटेफळ, ता. परंडा जि. धाराशिव हे 17.30 वा. सु. हॉटेल गारवाच्या शेजारी अंदाजे 2,870 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 41 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-शांताबाई किसन गायकवाड, रा. आरेकरवाडी, ता. भुम जि. धाराशिव हे 17.20 वा. सु. आरेकरवाडी येथे अंदाजे 4,525 ₹ किंमतीची 40 लि. गावठी दारु व देशी विदेशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
  • 4)येरमाळा पो. ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले.आरोपी नामे- अमर रामेश्वर कदम, वय 31 वर्षे, रा. वाघोली ता. कळंब, जि. धाराशिव हे 15.30 वा. सु. वाघोली ते येडशी जाणारे रोउवर वाझोली येथे अंदाजे 2,055₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 23 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-रोहन काकासाहेब वाघमारे, वय 21 वर्षे, रा. गौर ता. कळंब जि. धाराशिव हे 17.50 वा. सु. गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 2,630 ₹ किंमतीची 27 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
  • 5)भुम पो. ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले.आरोपी नामे-प्रशांत पोपट यादव, वय 27 वर्षे, रा. सावरगाव(पा) ता. भुम जि. धाराशिव हे 17.40 वा. सु. भुम ते खर्डा रोडवर असलेल्या हॉटेल ग्रीन गार्डन समोर अंदाजे 910₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 13 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-कमलाकर त्रिंबक गायकवाड, वय 46 वर्षे, रा. धानोरा खु ता. अहमदपुर जि. लातुर हे 18.20 वा. सु. पाथरुड ते ईट रोडवर हॉटेल आईसाहेब समोर अंदाजे 980 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 14 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
  • 6)मुरुम पो. ठाणेच्या पथकाने 1ठिकाणी छापा टाकला.आरोपी नामे-विजय मसाजी शिरसे, वय 35 वर्षे, रा. आनंदनगर मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव हे 18.30 वा. सु. बसस्थानक मुरुम समोरील मल्लाप्पा क्षिरसागर यांचे शेडसमोर मुरुम येथे अंदाजे 5,500 ₹ किंमतीची 55 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
  • 7)वाशी पो. ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला.आरोपी नामे-लताबाई देविदास कावळे, वय 57 वर्षे, रा. पाखरुड ता. भुम जि. धाराशिव या 15.10 वा. सु. पखरुड येथील हॉटेल साईराज येथे अंदाजे 1,400 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 17 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
  • 8)कळंब पो. ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला.आरोपी नामे-देविदास आत्माराम शिंदे, वय 48 वर्षे, रा. गंभीरवाडी, ता. कळंब जि. धाराशिव हे 17.45 वा. सु. गंभीरवाडी येथे अंदाजे 12,000 ₹ किंमतीचे 150 लि. गावइी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव जप्त करण्यात आले.
  • 9)लोहारा पो. ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला.आरोपी नामे-बबन रामराव सुर्यवंशी, वय 59 वर्षे, रा. माळेगाव ता. लोहारा जि. धाराशिव हे 19.00 वा. सु. माळेगाव ते वडगाव गांजा जाणारे रोडलगत मैत्री कट्टा हॉटेल समोर अंदाजे 960 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 12 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
  • 10)ढोकी पो. ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला.आरोपी नामे-रिणा दत्ता चव्हाण, वय 23 वर्षे, रा. कोंड ता.जि.धाराशिव हे 17.30 वा. सु. गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 4,525 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या 40 लि. गावठी दारु जप्त करण्यात आली.
  • 11)बेंबळी पो. ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला.आरोपी नामे-बशीर रहेमान मोगल, वय 65 वर्षे, रा. लासोना ता. जि. धाराशिव हे 17.15 वा. सु. लासोना येथे अंदाजे 3,360 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या48 सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • मुरुम पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान मुरुम पोलीसांनी दि.10.09.2024 रोजी 13.00 वा. सु. मुरुम पो ठाणे हद्दीत बसस्थानक समोर पत्र्याचे शेडचे समोर मोकळ्या जागेत मुरुम येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-दिलीप मानसिंग चव्हाण, वय 67 रा. यशवंत नगर मुरुम ता. उमरगा, इब्राहिम अमीर नदाफ, वय 48 वर्षे, रा. संभाजी नगर मुरुम ता. उमरगा हे 13.00 वा. सु. बस्थानक समोर पत्र्याचे शेडचे मोकळ्या जागेत मुरुम येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,100 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले मुरुम पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • उमरगा पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-संतोष शिवाजी वाघमोडे, वय 32 वर्षे, रा.कोरेगाव ता. उमरगा जि. धाराशिव यांची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्र एमएच 25 वाय 4253 अंदाजे 15,000 ₹ किंमतीची ही दि. 05.09.2024 रोजी 13.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संतोष वाघमोडे यांनी दि.10.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-गेनदेव दशरथ मोटे, वय 65 वर्षे, रा.कार्ला ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे कार्ला शिवारातील शेत गट नं 111 मधील टेक्समो एस कंपनीची पाणबुडी मोटार अंदाजे 10,000₹ किंमतीची आरोपी नामे- भास्कर मोटे, मारुती मोटे, शरद मोटे सर्व रा. कार्ला ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.18.06.2024 रोजी 22.00 ते दि. 19.06.2024 रोजी 09.00 वा. सु. चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-गेनदेव मोटे यांनी दि.10.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • मुरुम पोलीस ठाणे :आरोपी नामे-शिवरात उर्फ खंडू हनुमंत मंटगे, वय 31 वर्षे, बसवराज हनुमंत मंटगे, इराण्णा आप्पाराव गुंडगुळे, वय 33 सर्व रा. यशवंत नगर मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 09.09.2024 रोजी 22.30 वा. मुरुम बस्थानक येथे फिर्यादी नामे- सिद्राम धनराज ख्‌याडे, वय 36 वर्षे, रा. ख्‌याडे गल्ली मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी तु लाडाप्पा कालेकर यांना काढून का दिले या कारणावरुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारधार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सिद्राम ख्याडे यांनी दि.10.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 109, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे- एजाज अब्दुल काजी, वय 28 वर्षे, आझर बाबर पटेल, जुनेद इमामोद्दीन उमापुरे, हुसेन पटेल, ख्वाजा शेख, हाजी हताळे, आयुब जावेद मोजणीदार, वय 27 वर्षे, तक्की मुजावर, हाजी मुनवर ख्वाजा शेख, नदीम नासीर मुजावर, इस्माईल हुसने सौदागर, हुसेन पिरजादे सर्व रा. गुंजोटी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 06.09.2024 रोजी 20.30 वा. बाहेरपेठ गुंजोटी येथे फिर्यादी नामे- शरण उर्फ धिरज सिध्दाप्पा देशमुख, वय 24 वर्षे, रा. बसवेश्वर चौक गुंजोटी ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी धक्का लागण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईप, हंटर काठी व पट्याने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याच्या धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शरण देशमुख यांनी दि.10.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 189 (2), 191(2),191(3), 190, 118(1), 115(2), 352, 351(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • कळंब पोलीस ठाणे: मयत आरोपी नामे- लहु रामभाउ विभुते, वय 25 वर्षे, रा.भालगाव ता. केज जि. बीड हे दि.20.08.2024 रोजी 20.30 वा.सु ढोकी ते कळंब जाणारे रोडवर तेजल गॅस च्या समोरुन मोटरसायकल क्र एमएच 44 व्ही 3305 ही वरुन जात होते. दरम्यान मयत आरोपी नामे- लहु विभुते यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून समोरुन जात असलेल्या चारचाकी वाहनास पाठीमागून धडक दिली. या अपघातात लहु विभुते हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बाळासाहेब विक्रम मोरे, वय 32 वर्षे रा. भालगाव नं 1 ता. केज जि. बीड यांनी दि.10.09.2024 दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(अ),125(ब), 106(1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे: मयत नामे-हरिबा इराप्पा बनसोडे, वय 55 वर्षे, रा. बलसुर ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.21.08.2024 रोजी 14.30 वा. सु. हिंगमिरे यांचे शेताजवळ बलसुर ते सास्तुर रोडवरुन पायी जात होते. दरम्यान आरोपी नामे- तुकाराम रघुनाथ माने, रा. कोरेगाववाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 12 डब्ल्यु एफ 1967 ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून हरिबा बनसोडे यांना धडक दिली. या अपघातात हरिबा बनसोडे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या मयताची पत्नी फिर्यादी नामे- कमलाबाई हरिबा बनसोडे, वय 40 वर्षे, रा. बलसुर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.10.09.2024 दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(अ), 125(ब), 106(1)(2) सह कलम 184, 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
error: Content is protected !!