कळंब – कळंब ही जन्मभूमी आहे या गावात बालपण गेले मित्राचे सहकार्य व मोठ्या लोकांच्या आशीर्वाद याच्या जोरावर मुंबई येथे सर्वसामान्य वंचित लोकांसाठी काम करता आले.यासाठी सर्व जाती धर्मातील लोकांचे सहकार्य मिळाले काँग्रेस (आय) पक्षाने काम करण्याची संधी दिली आहे. कळंब येथे दहा वर्षापूर्वी उत्तर मुंबई जिल्हा काँग्रेस अध्यक्ष म्हणून माझा सत्कार झाला होता आज परत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा मुंबई प्रदेश उपाध्यक्ष म्हणून सत्कार होत आहे याचा मला आनंद वाटत आहे. अशा शब्दात कय्युम तांबोळी यांनी संत ज्ञानेश्वर बालकाश्रम कळंब येथे आयोजित सत्कार प्रसंगी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. कळंबचे सुपुत्र कय्युम तांबोळी यांची नुकतीच भारतीय काँग्रेसचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे.त्याबद्दल त्यांचा कळंब येथील ज्येष्ठ नागरिक व परिवाराच्यावतीने श्री संत ज्ञानेश्वर बालकाश्रम येथे महाराष्ट्र पोलीस मित्र असोसिएशनचे संस्थापक सचिव सुफी शमशोद्दीन सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात फेटा,शाल,पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी कय्युम तांबोळी यांच्या कार्याचा गौरव केला.तांबोळी कळंबचे सुपुत्र असून मुंबई येथे त्यांनी जनसेवेतून मोठा संपर्क तयार केला असून या कार्याची दखल घेऊन काँग्रेस पक्षाने मुंबई प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविली आहे.याचा कळंबकराना अभिमान आहे असे गौरव उद्गार काढले.या कळंब येथील ऐहसास फाउंडेशन च्या माध्यमातून उत्कृष्ट सामाजिक कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशन वतीने अमन मोमीन यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. याबद्दल अमन मोमीन यांचा कय्युम तांबोळी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष ह.भ.प.महादेव महाराज अडसूळ,मराठवाडा प्रदेश सचिव डी.के.कुलकर्णी, ज्येष्ठविज्ञ त्र्यंबकराव मनगिरे, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) कळंब शहर अध्यक्ष मुसद्दीक काझी,विधीज्ञ कल्पना निपाणीकर ( धाराशिव ), विलासराव करंजकर,कलीम तांबोळी ,मोहमंद चाऊस,ऑडिटर शिराज शेख,व्यापारी अनिस बद्रुद्दीन शेख,लतीफ तांबोळी,अमन मोमीन,तोफिक शेख ,भारत जोडो अभियानाचे अविनाश घोडके,हुसेन तांबोळी,जुबेद तांबोळी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य महादेव गपाट यांनी तर आभार प्रदर्शन माधवसिंग राजपूत यांनी केले.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन