कळंब – मणिपूर राज्यात आज जो वाद सुरू आहे या झगड्याचे कारण भूप्रदेश आहे. या राज्याची लोकसंख्या अधिक व जमीन कमी आहे. राज्यात प्रमुख जमाती कुकी व मैतई या असून नागा व कुकी या मिळून 50% लोकसंख्या व मैतई जमातीची लोकसंख्या 50 ℅ आहे. मैतई जमातीत वेगवेगळ्या धर्माचे लोक समाविष्ट असून एक वंशज आहेत. यामुळे सांस्कृतिक दृष्ट्या हे एक आहेत. धर्मांतरित ख्रिश्चन असतानाही आपली संस्कृती जपतात. धर्मांतरित असूनही जुन्या धर्माप्रमाणे वागतात . ईशान्य भारतातील लोक स्वतःची वंशिक ओळख पुसू देत नाहीत. धर्मापेक्षा वंश व जमात श्रेष्ठ मानतात .
राजकारणाच्या बाबतीत बोलताना शाहू पाटोळे यांनी नॉर्थ ईस्ट चे राजकारण दिल्लीकडे तोंड करून असते असे सांगितले.
कळंब येथे कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने मणिपूर राज्यातील संघर्ष या विषयावर , “थोड बसू, थोड बोलू, थोडी चर्चा करू” या उपक्रमअंतर्गत माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सेवा निवृत उपसंचालक शाहू पाटोळे यांचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. त्यांनी मणिपूर कालचे, आजचे आणि उद्याचे या वर अभ्यास पूर्ण प्रकाश टाकला.
पाटोळे यांनी आपल्या मार्गदर्शनात नॉर्थ ईस्ट राज्यातील भौगोलिक सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विषयावर अभ्यासपूर्ण माहिती दिली.
आपल्या हक्काच्या आणि अधिकाराच्या बाबतीत लोक जागृत आहेत मणिपूर साठी संविधानाचे कलम 371 सी आहे. परंतु त्या कलमाच्या बाबतीत हे लोक बोलत नाहीत असे हि सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मंचावर उपस्थित जि.प.सदस्य शहाजी पाटील , सामाजिक कार्यकर्ते डॉ. रामकृष्ण लोंढे, मुसदेक काझी, दखलचे संपादक गणेश शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कार्यक्रमासाठी पं. स.चे माजी सभापती भास्कर खोसे,ज्येष्ठ पत्रकार अनंत अडसूळ,भागवतराव धस ,जमीन अधिकार आंदोलनाचे नेते विश्वनाथ तोडकर , जेष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ ,भागवतराव धस ,ज्येष्ठ पत्रकार गणेश शिंदे ,मित्रजीत रणदिवे, भारत गुडे, बापू भंडारे ,बाळासाहेब कांबळे,सााहित्यक रमेश बोर्डेकर, सामाजिक कार्यकर्त भास्करराव सोनवणे, बंडू ताटे, संजय पाटोळे ,कामगार नेते डी. टी. वाघमारे, शहाजी रितापुरे, प्राचार्य जगदीश गवळी ,शितल कुमार घोंगडे,आश्रुबा कोठावळे,श्याम तोडकर, यांची उपस्थिती होती .
सूत्रसंचलन व पाहुण्यांचा परिचय माधवसिंग राजपूत यांनी करून दिला तर आभार सतीश टोणगे यांनी मानले. विचारलेल्या अनेक प्रश्नांना त्यांनी अभ्यास पूर्ण उत्तरे दिली
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात