August 9, 2025

पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनवणे

  • कळंब – शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यानुभव या विषयांतर्गत मातीच्या वस्तू बनवणे यामध्ये पर्यावरण पूरक गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली.कार्यानुभव विषय शिक्षक ज्ञानेश्वर तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कार्यशाळा घेण्यात आली. गणेश मूर्ती बनवणाऱ्या विद्यार्थी प्राची भवर,दूर्वा माळी,राजनंदिनी माळी,आराध्या राऊत,ज्ञानेश्वरी दीक्षित, दिव्या लोखंडे, आर्या हारकर,संध्या पाटोळे,गौरी ताटे, आरोही कदम,दूर्वा जंत्रे,स्वरा हातोलकर,अनधा गुठाळ, श्रावणी कदम, श्रावणी चोंदे, सई चोंदे, सुशांत कापसे, सोहम बोराडे, राजवीर लोखंडे, अभिनव खामकर, शौर्य कदम, श्लोक माने, शंतनु बारटक्के आधी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थ्यांचे पर्यवेक्षक काकासाहेब मुंडे, उपप्राचार्य डॉ. मीनाक्षी शिंदे भवर, शंकर गोंदकर तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपक्रमाचे कौतुक केले.
error: Content is protected !!