कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद. सलंग्नित छ.शिवाजी महाविद्यालय,कळंब व रासेयो/आयक्युएसी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाविद्यालयात ०६ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन प्राचार्य.शशिकांत जाधवर यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी प्राचार्य.शशिकांत जाधवर यानी प्रास्ताविक करताना ५ सप्टेंबर शिक्षण दिनाचे महत्त्व या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.तसेच महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु.आरजु खाँजा शिकलकर यानी आई व शिक्षक यांचे आपल्या जीवनात असलेले महत्त्व या विषयावर मनोगत व्यक्त केले.तसेच रोटरी क्लब ऑफ कळंब सिटीचे सर्व पदाधिकारी व संस्थेचे सहसचिव संजयजी घुले यानी सर्व प्राध्यापक बंधूचे गुलाब पुष्प देऊन सत्कार केले व शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँक मर्या.शाखा कळंब चे मॅनेजर व त्यांचे सहकारी यानी महाविद्यालयात येऊन सर्व प्राध्यापकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत पुष्पगुच्छ देऊन सम्मानित केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार डॉ.हनुमंत माने यानी केले.एनएसएस विभाग प्रमुख सौ.मनिषा कळसकर मॅडम व आयक्युएसी विभाग डॉ.अनिल जगताप उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील डॉ. विद्युलता पवार मॅडम,प्रा. सुनिता चोंदे मॅडम डॉ.अनंत नरवडे, डॉ.उद्धव गंभिरे,डॉ.घाडगे, प्रा.शफीक चौधरी, प्रा.शिंगटे,प्रा.महेश पवार डॉ.महावीर गायकवाड डॉ.हंडीबाग प्रा.अमर खबाले प्रा.ढहाणे प्रा.तोडकर प्रा.चोरघडे प्रा.घोळवे प्रा.कसबे,शेंडगे,जयसिंग चौधरी,काका चोंदे,सुंदर कदम,अशोक भोसले दत्तात्रय गायकवाड,दत्ता कांबळे यांच्यासह शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात