कळंब – कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूल व रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शाडू माती पासून गणपती बाप्पाच्या पर्यावरणपुरक मूर्ती बनवण्याची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेस कळंब व आजूबाजूच्या परिसरातील लहाणग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी उपस्थिती दाखवली व सर्वांनी मूर्तीकला कौशल्याचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांना पाहुण्यांकडून पर्यावरण संवर्धनाचे धडे देण्यात आले. कॅनव्हासचे कला शिक्षक व मूर्तीकलाकार शरद अडसूळ यांनी मूर्ती घडवण्याचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले व चिमुकल्यांनी स्वतःच्या हातांनी आपले बाप्पा साकारले. पालकांनी देखील सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी रोटरीचे अध्यक्ष रो. अरविंद शिंदे, रो.डॉ.सचिन पवार, रो.अशोक काटे, कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूलचे संस्थापक रवि नरहिरे,शाळेचे मुख्याध्यापक आळंदकर, उपमुख्याध्यापक अष्टेकर सर व शिक्षक वृंद उपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात