कळंब – भारतीय बौद्ध महासभा अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या वर्षावासानिमित्त बुधवार व गुरुवार दि.५ सप्टेंबर २०२४ रोजी अनुक्रमे देवधानोरा पाटी येथे भीमा वाघमारे यांचे निवासस्थानी व देवधानोरा गावी बौद्ध विहारात वर्षावासानिमित्त प्रवचन आयोजित करण्यात आले. वर्षावासामध्ये माणसाने कसे राहावे? काय खावे? कसे असावे?कसे दिसावे? व सात्विक जीवनाचा अंगीकार करून एकमेकांबद्दल आपुलकीची भावना बाळगणे,कोणत्याही कारणास्तव घराच्या शेजाऱ्याबरोबर बुद्धांनी सांगितलेली मैत्री भावना कायम ठेवून वैरविरहित जीवन कसे जगावे? याविषयी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार सचिव लक्ष्मण धावारे यांनी प्रवचन केले. याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जेष्ठ सदस्य महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सेवानिवृत्त कॅशियर अरुण लोंढे,संघटक प्रा. सुरेश धावारे उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धम्म प्रचारक चोखोबा वाघमारे, हिम्मत वाघमारे,ज्येष्ठ नागरिक भीमा वाघमारे,रोहित किर्ते,अंकुश वाघमारे, सुनील वाघमारे,जयदेव वाघमारे, सुरज वाघमारे, तेजस वाघमारे, किरण वाघमारे,श्याम वाघमारे,वनिता नाईकवाडे,रेखा वाघमारे,शेषाबाई वाघमारे अनुष्का नाईकवाडे वैशाली वाघमारे,निकिता वाघमारे,ज्येष्ठ नागरिक धर्मां वाघमारे, दिपाली वाघमारे,आस्था वाघमारे, आणि महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात