कळंब ( माधवसिंग राजपूत ) – आज गणेश चतुर्थी निमित्त कळंब शहरात उत्साहाचे वातावरण होते. यानिमित्त गेली आठ दिवस शहरातील मेन रोड येथील बाजारपेठ विविध आकर्षक गणेश मूर्ती तसेच पूजा साहित्य यांनी सजली असून गणेश मूर्ती व सजावटीचे साहित्य घेण्यासाठी आबाल वृद्धांची बाजारपेठेत गर्दी होती.गणेश चतुर्थी रोजी गणपती बाप्पाचं आगमन होतं.गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या कालावधीत घरोघरी तसेच शहरातील विविध गणेश मंडळाच्या वतीने गणेश मूर्तीची मिरवणुकीने वाजत गाजत स्थापना केली जाते. यानिमित्त दहा दिवस समाज प्रबोधन पर सांस्कृतिक विविध उपक्रम व कार्यक्रम घेतले जातात.आज गणेश चतुर्थी निमित्त सकाळी सात वाजल्यापासून गणेश भक्तांची गणेश मूर्ती खरेदीसाठी गर्दी होती.दिवसभर पावसाने उघडी दिली असली तरी संध्याकाळी सहा वाजता पावसाच्या सरी कोसळल्या तरीही पडत्या पावसात गणेश भक्तांनी गणेश मूर्ती घेऊन जाण्यासाठी गर्दी होती.रात्री उशिरापर्यंत विविध गणेश मंडळांनी ढोल,ताशाच्या गजरात वाजत गाजत गणरायाची स्थापना केली. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कळंब पोलीस स्टेशन अंतर्गत २७ गावात एकूण ६७ गणेश मंडळांनी गणेश मूर्ती स्थापनेसाठी परवाना मागणी अर्ज केला आहे यात कळंब शहरातील १२ गणेश मंडळाचा समावेश होता यानंतरही गणेश मंडळाकडून परवाना मागणीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जात आहेत.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात