August 9, 2025

मोहेकर महाविद्यालयात शिक्षकदिन साजरा

  • कळंब – शिक्षकदिन म्हणजे शिक्षकांचा सन्मान होय.देशाचे भविष्य शिक्षकांच्या हाती आहे. मानवी जीवनाला आकार देणारी ज्ञानदान ही पवित्र प्रक्रिया आहे. भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञानदानाला महत्त्वाचे स्थान आहे. नवीन शैक्षणिक धोरण समजून त्यात कौशल्य आधारित अभ्यासक्रमाची रचना केली असल्याचे सांगितले आहे. गुरु-शिष्य हे विश्‍वासाचे आणि त्यागाचे नाते आहे, असे प्रतिपादन देविदास पाठक ( राज्यपाल नियुक्त सिनेट सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ) यांनी केले.
    शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य डॉ.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील सांस्कृतिक विभाग,रासेयो,अंतर्गत गुणवत्ता कक्ष,आणि एन.सी.सी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षकदिन कार्यक्रमात देविदास पाठक बोलत होते.
    नवीन शैक्षणिक धोरण आणि अंमलबजावणी या अनुषंगाने बोलताना म्हणाले,विद्यार्थ्यांना आता हा काळाशी सुसंगत व्यवसायाभिमुख,कौशल्य आधारीत अभ्यासक्रम निवडणे सोपे झाले असून त्याचे नवीन स्वरूप तयार करण्यात आले आहे.त्याप्रमाणे आपापल्या गरजेचे असलेले प्रमाणपत्र अभ्यासक्रम पदवी सोबतच उपलब्ध आहेत.” असे मत पाठक यांनी मांडले आहे.या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर प्राचार्य सुनील पवार,उपप्राचार्य डॉ. हेमंत भगवान,डॉ. डी. एन. चिंते,प्रा.डॉ. गुंडरे यांनी कार्यक्रमाची सुरुवात पूज्य ज्ञानदेव मोहेकर गुरुजी आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. सूत्रसंचालन प्रा.ए आर मुखेडकर,कु.ज्ञानेश्वरी पांचाळ आणि साक्षी जावळे यांनी आभार मानले.
    यानिमित्त महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.यावेळी काही विद्यार्थ्यांनी आणि प्रा.दत्ता साकोळे,प्रा.डॉ.दादाराव गुंडरे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ. प्रा.डॉ. दीपक सूर्यवंशी यांनीही मनोगत व्यक्त केले.
        कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.सुनील पवार म्हणाले, “आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करा. आणि आपल्या करिअरच्या काळामध्ये अभ्यास करा शिस्त पाळा असा संदेश दिला. शिक्षक दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल धन्यवाद देऊन आपणास विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी , यावेळी अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे समन्वयक प्रा.अर्चना मुखेडकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.संदिप महाजन,डॉ.पल्लवी उंदरे,प्रा. डॉ. राघवेंद्र ताटीपामूल, प्रा.डॉ. गुंडरे,प्रा.डॉ.मीनाक्षी जाधव, प्रा. एन.जी.साठे, प्रा.डॉ.पावडे,प्रा. डॉ.ईश्वर राठोड, डॉ.श्रीकांत भोसले, प्रा.मारुती शिंपले, प्रा. शाहरुख शेख,प्रा.डॉ.नागनाथ अदाटे,प्रा.डॉ. चंदनशिव समाधान,अधीक्षक हनुमंत जाधव, सहाय्यक ग्रंथपाल अरविंद शिंदे व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
error: Content is protected !!