August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलीस नामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.03 सप्टेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 244 कारवाया करुन 2,04,100 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे: आरोपी नामे-राजेंद्र कृष्णात दिंडोळे, वय 50 वर्षे, रा. चिलवडी, जि. धाराशिव हे दि.03.09.2024 रोजी 12.30 वा. सु. झोपडपट्टी चिलवडी येथे अंदाजे 900 ₹ किंमतीची 15 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • उमरगा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.03.09.2024 रोजी 16.05 वा. सु.उमरगा पो ठाणे हद्दीत तलमोड चेक पोस्ट जवळ किसन जाधव यांचे शेतात छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-भिम धरम कांबळे वय 34 वर्षे, रा.मठांळ, ता. बसवकल्याण जि. बिदर हे 16.05 वा. सु. तलमोड चेक पोस्ट जवळ किसन जाधव यांचे शेतात कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 710 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
  • येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे-राहुल आश्रुबा शिनगारे, वय 27 वर्षे, रा.लहरी ता.केज जि. बीड जि. धाराशिव हे दि.03.09.2024 रोजी 17.50 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 44 एक्स 4715 ही येरमाळा जे बार्शी रोडवर पोलीस ठाणे येरमाळा समोर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देवून वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • येरमाळा पोलीस ठाणे : आरोपी नामे-शाहीद रफीक कुरेशी, वय 19 वर्षे, रा. राशिन ता. कर्जत जि. अहमदनगर हे दि 02.09.2024 रोजी 21.16 वा. सु. बिड ते धाराशिव जाणारे एनएच 52 हायवे रोडलगत साई मोटार गॅरेज जवळ चिंचेच्या बागेजवळ जवळ पिकअप वाहन क्र एमएच 42 बीएफ 2098 चा चालकाने त्याचे ताब्यातील वाहनात एकुण 2, 77, 000 ₹ किंमतीच्या 3 जर्शी गायी कोंबून निर्दयतेने जनावरांचे सुरक्षीततेची खबरदारी न घेता दोरीने आवळून बांधून जनावरे कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतुक करीत असताना येरमाळा पो. ठाणेच्या पथकास मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा कलम 3, 11 (1)(एफ) (डी))(एच)(के) मपोका कलम 119, म.पो.अ.83/177,184 प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5,5(अ) (1) (2), 5(ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे : आरोपी नामे-संदीप नागनाथ माने, वय 34 वर्षे, रा. वेताळनगर तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव, ह.मु. एस टी कॉलनी भवानी चौक धाराशिव यांनी दि 02.09.2024 रोजी 21.50 वा. सु. किरणा मळा येथील पडक्या कत्तल खान्याजवळ धाराशिव येथे त्याचे ताब्यातील तीन जर्शी गायी या बांधून ठेवलेल्या असताना धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(ब), 9 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
  • लोहारा पोलीस ठाणे :आरोपी नामे- राजपाल दत्तु राजपुत वय 31 वर्षे, रा. माकणी ता. लोहारा बु. जि. धाराशिव, दादासाहेब अंगत पाटील, वय 31 वर्षे, रा. नागुर ता. लोहारा बु. जि. धाराशिव हे दोघे दि.03.09.2024 रोजी 14.00 ते 15.00 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे क्रुझर एमएच 13 एसी 8694 व क्रुझर क्र एमएच 29 एआर 3404 ही वाहने छत्रपती शिवाजी महाराज चौक लोहारा येथे लोहारा ते माकणि जाणारे रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये लोहारा पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • “मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • कळंब पोलीस ठाणे: फिर्यादी नामे- रमाकांत किसनराव गोरे, वय 77 वर्षे, रा. कल्पना नगर कळंब ता. कळंब जि.धाराशिव बी एस एन एल ऑफीस कळंब चे गेट समोरील डावे बाजूस असलेले बंद पत्र्याचे शेड समोर असताना अनोळखी दोन इसमांनी रमाकांत गोरे यांना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दंगल चानलू आहे.असे सांगून आपल्या कडील सोन्याची अगंटी काढून आमच्या कडे द्या त्यावर नमुद आरोपींनी फिर्यादीस ढकलून देवून त्यांची अंदाजे 50,400₹ किंमतीची 8 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेवून पसार झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रमाकांत गोरे यांनी दि.03.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं. 309(4) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • भुम पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-नंदकुमार दिगंबर वेदपाठक, वय 54 वर्षे, रा. राममंदीर शेजारी कसबा भुम यांचे गांधी चौक भुम येथील नंदकुमार ज्वेलर्स नावाचे दुकानाचे कुलूप अज्ञात व्यक्ती दि. 02.09.2024 ते 20.00 ते दि. 03.09.2024 रोजी 05.00 वा. सु. जोडून आत प्रवेश करुन 3,420 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व बापुराव गौरीशंकर उंबरे यांचे राहते घराचे कडी कोंडा तोडून घरातील 9 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 2,92,540₹ किंमतीचा माल चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नंदकुमार वेदपाठक यांनी दि.03.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. 331(4), 305 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • कळंब पोलीस ठाणे: फिर्यादी नामे-महादेव श्रीराम मुंडे, वय 25 वर्षे, व्यवसाय सुपरवायझर महाराष्टर जिवन प्राधिकरण विभाग धाराशिव रा.अंबाजोगाई, ता. अंबाजोगाई जि. बीड यांचे दि. 01.09.2024 रोजी 14.00 ते दि. 03.09.2024 रोजी 10.00 वा. सु. रांजेद्र दगडुअप्पा मुंडे यांचे शेतातील वार्षी भाडेतत्तावार घेतलेल्या गोडावून समोर डिकसळ येथुन 72,000₹ किंमतीचे 6 स्वीस ऑल, दोन एअर ऑल हे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-महादेव मुंडे यांनी दि.03.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • फसवणुक.”
    परंडा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-नुरोद्दीन मोहम्मद युनुस मोहम्मद इद्रीस चौधरी, वय 52 वर्षे, नालसाब गल्ल परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि. 16.08.2024 रोजी 12.05 ते 20.08.2024 रोजी 16.00 वा. सु. एचडीएफसी बॅक अकाउंटवरुन आरोपी नामे- अंकिता शर्मा मोबाईल नं- 9046533493 यांनी फिर्यादीस फोन करुन महानगर गॅस एजन्सी येथे कार्यरत असल्याचे खोटे सांगून गॅस पंप एरिया लॉकिंग व परवान्याचे कामासाठी फिर्यादी यांचे कडून सीएनजी गॅस पंपाकरीता पात्र असल्याचे सागुंन एरिया लॉकींग फिस करीता 37,500₹ आरटीजीएस द्वारे बॅक खाते क्र 267312010000790 युनियन बॅक ऑफ इंडिया आयएफएससी युबीआयएन 0531677 पाठविण्यास सांगून त्यानुसार फिर्यादीने एकुण 4,82,500₹ भरले असुन त्यात फिर्यादी यांना सीएनजी गॅस पंपाकरीता पात्र असल्याचे खोटे सागुंन फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नुरोद्दीन मोहम्मद युनुस यांनी दि.03.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 318(4) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66(ड) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • मारहाण.”
    धाराशिव शहर पोलीस ठाणे : आरोपी नामे-मुजीद(मुंज्या) दिलावर शेख, मुजायीद मनसुर शेख,आरेफ दिलावर शेख सर्व रा. मदीना चौक धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि. 31.08.2024 रोजी 20.00 वा. सु. तुळजापूर नाका शितल बार धाराशिव येथे फिर्यादी नामे- हुसेन पापा शेख, वय 29 वर्षे, रा.तुळजापूर नाका धाराशिव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,लोखंडी पाईप व कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-हुसेन शेख यांनी दि.03.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 351(3), 352, 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
error: Content is protected !!