धाराशिव – (जिमाका) जिल्हयातील जास्त मृत्यू होणाऱ्या रस्त्यावर अपघाताचे स्थळ व रस्ता याचे मॅपींग करुन स्थळे निश्चित करण्यात आली होती.अशा वारंवार होणाऱ्या अपघात प्रवण क्षेत्रात असुरक्षित जागा असल्याचे दिशादर्शक लावण्यात आले आहेत. तसेच रस्ता सुरक्षिततेबाबत जनजागृती केल्याने जिल्हयातील अपघातांच्या प्रमाणात 17 टक्के घट झाली असून अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाणही घटले आहे. जिल्हयात रस्ता सुरक्षा उपाययोजनेसाठी स्वतंत्रपणे जिल्हा रस्ता सुरक्षा उपाययोजना सुरु करण्यात आली आहे.यातून नागरिकांना रस्ता सुरक्षेबाबत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.यामध्ये रस्ता सुरक्षा हॉल, रस्ता सुरक्षा जनजागृती मोहिम, संगणक प्रणालीसह मोबाईल व्हॅन, रस्ता सुरक्षा बॅनर,शाळकरी मुलांसाठी रस्ता सुरक्षा पुस्तक,उत्तल आरसा, रस्त्याच्या डाव्या बाजूने चाला आदी बाबींचा समावेश आहे.या माध्यमातून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने जनजागृती केल्याने जिल्हयात होणाऱ्या अपघातात घट झाली आहे. जानेवारी 2024 ते जून 2024 पर्यंत जिल्ह़यात एकूण 283 अपघात झाले.तर अपघातांची हीच संख्या जानेवारी 2023 ते जून 2023 मध्ये 354 इतकी होती.तर 2023 च्या तुलनेत सन 2024 मध्ये जवळपास 17 टक्क्यांनी अपघाताचे प्रमाण घटले आहे.तसेच अपघातात मृत्यू होण्याचेही प्रमाण घटले असून सन 2023 मध्ये 354 अपघातात 133 पुरुष तर 25 महिला असे 158 जणांचा मृत्यू झाला होता.तर सन 2024 च्या जानेवारी ते जून या सहामाहीमध्ये 293 अपघातात 132 पुरुष आणि 20 महिला असे 152 मृत्यू झाले आहेत.या सहा महिन्यात सन 2023 च्या जानेवारी ते जून या सहा महिन्यातील मृत्यूमध्ये सन 2024 मधाील सहामध्ये जवळपास 3.79 टक्क्याची घट झाली आहे. जानेवारी 2023 ते जून 2023 या सहामाहीत अपघातात गंभीर जखमी होणाऱ्यांचे प्रमाण 21.58 टक्क्यांनी कमी झाले आहे.यामध्ये सन 2023 मध्ये 224 पुरुष तर 68 महिला असे 292 जण गंभीर जखमी झाले होते. तेच प्रमाण 2024 मधील जानेवारी ते जून या सहा महिन्यामध्ये 182 पुरुष तर 47 महिला असे 229 जण गंभीर जखमी झाले होते.हीच टक्केवारी 2023 मध्ये 14.33 टक्के होती.किरकोळ जखमी होण्याचे प्रमाणही 53.84 टक्क्यांनी घटले आहे.सन 2023 मध्ये पुरुष आणि महिला मिळून 39 जण तर 2024 मध्ये हेच प्रमाण 18 इतके होते.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी