August 9, 2025

संततधार पावसाने कळंब येथील एकात्मिक बालविकास योजना कार्यालया भोवती पाण्याचे तळे

  • कळंब ( माधवसिंग राजपूत ) – दि.३१ऑगस्ट शनिवारच्या संध्याकाळपासून कळंब शहर व तालुक्यात पावसाची संतत धार असून दि.१ सप्टेंबर रविवार व सोमवार दुपारपर्यंत हा पाऊस सुरू होता पावसाच्या पाण्याने शहरातील नाले तुडुंब भरून वाहत असून खड्ड्यात जागोजागी पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे या पावसामुळे एकात्मिक बाल विकास योजना कार्यालयासमोर पाणीच पाणी असून याला तळ्याचे स्वरूप आले आहे यामुळे कार्याकडे जाण्यासाठी रस्ताच राहिलेला नाही.कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्या तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आज कार्यालयात कामकाजासाठी जाता आले नाही कार्यालयाचे दार बंद ठेवावे लागले कळंब तालुका एकात्मिक बालविकास योजना कार्यालया अंतर्गत तालुक्यातील लहान बालकासाठी अंगणवाडी तसेच महिला व बालकासाठी विविध उपक्रम राबविले जातात. महिला व बालक यांच्याशी संबंधित असलेल्या या कार्यालयासाठी साधा रस्ताही नाही सदरील कार्यालय पडीक वस्तीगृहाच्या शेजारी असून कार्यालयाकडे जाण्याचा रस्ता खाच,खळगे तसेच खड्डामय असून थोडा पाऊस पडला तरी या रस्त्याच्या ठिकाणी पाणी साचते व चिखल होतो या चिखलातून कार्यालयात जावे लागते. या प्रश्नाविषयी संबंधित एकात्मिक बालविकास योजनेच्या अधिकारी यांच्याकडे विचारणा केली असता सदरील काम पंचायत समिती कार्यालया अंतर्गत येत असल्याने त्यांना याविषयी वारंवार कळविण्यात आले आहे परंतु पंचायत समिती कार्यालयाकडून हा रस्ता व यासाठीच्या तरतुदी विषयी उपायोजना केल्या जात नाहीत पाऊस पडला की समस्या अधिक तीव्रतेने जाणवते.रात्र व दिवस झालेल्या संततधार पावसाने पाणी इतक्या मोठ्या प्रमाणावर साचले आहे की लहान बालकांना कडेवर घेऊन जावे लागेल महिला व बालकल्याण यासाठी असलेल्या कार्यालयाकडे व या समस्येकडे वरिष्ठ कार्यालयाचे इतके दुर्लक्ष कशामुळे आहे व गतिमान कारभार करणारे सरकारी अधिकारी व यावर नियंत्रण असणारे कारभारी यालाच म्हणायचे का? हे याचे उत्कृष्ट उदाहरण आहे थोडा पाऊस पडला ही रस्त्यात चिखल होतो पाणी साचते रस्ता बंद होतो चिखलातून कार्याकडे जावे लागते रस्ता दुरुस्तीची चर्चा या कार्यालयात सुरू होते हे वारंवार घडत आहे परंतु रस्ता मात्र केला जात नाही कालच्या संतधार पावसामुळे मात्र कार्यालय कुलूपबंद ठेवावे लागत आहे झोपलेल्या प्रशासनाचे दृश्य बघून आता तरी डोळे उघडतील का असा प्रश्न नागरिक विचारीत आहे.
error: Content is protected !!