August 9, 2025

राज्य कार्यकारणी सदस्यपदी विजय गायकवाड यांची नियुक्ती

  • धाराशिव – लोकशाही समाज निर्मितीसाठी कटिबध्द असलेली भारतीय संसदीय लोकशाही व्यवस्थेत स्वातंत्र्य,समता,बंधूता, न्याय व्यक्तीची प्रतिष्ठा या प्रती संविधान कटिबध्द आहे, स्वावलंबी व स्वाभिमानी साहित्यिक चळवळ,गतीमान करण्यासाठी मानव प्रतिष्ठा, सृजनता,साहित्य परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. या परिषदेच्या राज्य कार्यकारणी सदस्यपदी धाराशिव येथील साहित्यिक आंबेडकर विचारधारेचे अभ्यासक विजय गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
    निवडीचे पत्र संघटनेचे अध्यक्ष चंद्रप्रकाश शिंदे यांनी दिले आहे. या निवडीबद्दल पी.के.बनसोडे, पंडीत कांबळे,अभिमन्यु इंगळे, प्रा.कल्याण कांबळे व मित्र परिवारातून अभिनंदन होत आहे.
error: Content is protected !!