August 9, 2025

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत करावी – आ.कैलास पाटील

  • कळंब – राज्यासह धाराशिव जिल्हयामध्ये मागील दोन दिवसात अतिवृष्टी व सततचा पाऊस चालु असल्यामुळे पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान होऊन काही ठिकाणी जनावरेही मृत पावलेली आहेत. धाराशिव जिल्हयातील १६ महसुल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे व इतर महसुल मंडळामध्येही सततच्या पावसाने काढणीला आलेल्या मुग,उडीद, पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले असुन पिक पाण्याखाली गेल्यामुळे जागेवरच त्याला मोड येत असुन मुख्य पिक असलेले सोयाबीन शेंगा भरण्याच्या अवस्थेत असुन सोयाबीन पिकात पाणी साचल्यामुळे ते पिवळे पडत आहे. त्याचबरोबर कापुस, कांदा पिकाचे व कांदा लावणीसाठी तयार करण्यात आलेल्या कांदा रोपाचेही मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याने हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिराऊन घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरीव अशी आर्थिक मदत करावी अशा मागणीचे निवेदन धाराशिव-कळंब मतदार संघाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

error: Content is protected !!