August 9, 2025

“मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनाअंतर्गत उमेदवारांना केलेले अवाहन.”

  • मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनअंतर्गत धाराशिव जिल्हा पोलीस आस्थापनेवरील एकुण 106 रिक्त पदे (प्रशिक्षणार्थी कार्यालयीन मदतनिस) भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असुन योजनेचा कालावधी हा सहा (6) महिने असणार आहे. सदर योजनेचा लाभ घेणेकरिता उमेदवाराचे वय 18 ते 35 वयोगटामध्ये असणे आवश्यक आहे. 12 वी (6000/-₹), डिप्लोमा (8000/-₹) व पदवी(10,000/-₹) झालेले उमेदवार योजनेचा लाभ घेवु शकतात. शैक्षणिक अर्हतेप्रमाणे उमेदवारास विद्यावेतन देण्यात येईल. त्यासाठी उमेदवाराचे एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन झालेले असणे आवश्यक आहे. ऑनलाईन वेबसाईटला तांत्रिक अडचण येत आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी येताना आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, कागदपत्रे व स्वत:चे शैक्षणिक कागदपत्रे सोबत आणावेत. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय, धाराशिव येथील जिल्हा विशेष शाखा येथे दि. 26.08.2024 रोजी 10.00 वा. सु. हजर रहावे.
    मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनाअंतर्गत प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या उमेदवारांनी याची नोंद घ्यावी असे अवाहन मा. पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी केले आहे.
error: Content is protected !!