धाराशिव (राजेंद्र बारगुले ) – बदलापूर येथील घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. या घटनेतील जे आरोपी आहेत त्या आरोपींना कडक शिक्षा मिळावी याकरता सरकारने तात्काळ फास्टट्रॅक कोर्टात हा खटला देण्याची घोषणा केली आहे. मात्र अत्यंत कमी कालावधीत हा निकाल लावून आरोपींना जास्तीत जास्त कडक शिक्षा द्यावी जेणेकरून पुन्हा अशा घटना महाराष्ट्रात होणार नाहीत.महाराष्ट्र हे देशात सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखले जाते मात्र अशा राज्यामध्ये बदलापूर सारख्या घटना घडत असून सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे लोकांचा उद्रेक त्या ठिकाणी पाहायला मिळाला.तीन वर्षाच्या लहान मुलीवर बलात्कार म्हणजे ही मनाची अत्यंत मोठी विकृती असून अशा नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी असे देखील या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी