August 9, 2025

नागरिकांना मिळणार रानभाज्यांची मेजवानी

  • धाराशिव (जिमाका) – पावसाळयात सुरुवातीला आरोग्यासाठी विविध गुणसंपन्न असलेल्या मानवी आहारात प्रमुख मेजवानी ठरणाऱ्या रानभाज्यांच्या जिल्हास्तरीय महोत्सव सन 2024-25 चे आयोजन 28 ऑगस्ट रोजी धाराशिव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या परिसरात करण्यात आले आहे.
  • ग्रामीण भागामध्ये पावसाच्या सुरुवातीला रानभाज्या मोठ्या प्रमाणात येत असून विविध गुणधर्माने त्या परिपूर्ण असतात. त्यातील अनेक वनस्पती खाण्यासारख्या असून आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहेत.रानभाज्या व रानफळामध्ये करटुले, तोंडली, हादगा, कुंजिर,चिवळ, तांदुळाजा, लसूणपात,कुरडू,पाथरी,कढीपत्ता, आघाडा,अंबाडी, बांबू,केना,आळूचे पान, उंबर,पिंपळ,शेवगा,कपाळपुटी, गुळवेल, कोरफड,काशीद,फांजी,वासनवेल, काटेमाठ,सराटा,ओवापान,कवठ आदी भाज्या जिल्हयात आढळतात.
    विविध रानभाज्या ह्या मधुमेह,पोटदुखी,खोकला आदीवर औषधी म्हणून उपयुक्त ठरल्या आहेत. रानभाज्यांबाबत शहरातील चाणकामध्ये मोठी उत्सुकता असते.या भाज्यांची ओळख,आस्वाद आणि त्यांचे गुणधर्म जाणुन घेण्यासाठी शहर व जिल्हातील सर्व नागरीकाकरीता जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन आत्मा व कृषि कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवास जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला,शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या,शेतकरी,नागरीकांनी सहभाग होवून आरोग्यकारक,निसर्गस्नेही व पर्यावरणपोषक जैवविविधतेच्या या रानभाजी महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक के.आर.सराफ आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र माने यांनी केले आहे.
  • *उत्कृष्ट सादरीकरणाचा होणार गौरव…*
  • रानभाज्या महोत्सवात शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी,शेतकरी यांना प्रमाणपत्र व विविध रानभाज्यांची मांडणी,रेसीपी व सादरीकरण करणाऱ्या उत्कृष्ट शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी यांना पारीतोषिक देऊन यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.
error: Content is protected !!