कळंब – समाजाचे संरक्षक पोलीस बांधव यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी धाराशिवच्यावतीने राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. दि.१९ ऑगस्ट २०२४ रोजी कळंब शहरातील राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने कळंब शहर पोलीस स्टेशन येथे समाजाचे संरक्षण आणि समाजाच्या संरक्षणाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे अशा पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा बहिण भावाच्या पवित्र नात्याचा उत्सव साजरा करण्यात आला. आपले कर्तव्य पार पाडत असताना आपल्या घरापासून दूर असलेल्या पोलीस बांधवांना राष्ट्रवादीचा महिला भगिनींनी राख्या बांधून हा उत्सव साजरा केला याबद्दल पोलीस बांधवांनी ही उपमुख्यमंत्री अजित दादांच्या जशा तुम्ही भगिनी तशाच आमच्याही भगिनी आहात. आपल्या संरक्षणाची जबाबदारी आम्ही नक्कीच पार पाडू असे या सणाच्या दिवशी वचन दिले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या जिल्हा महिला अध्यक्षा सरलाताई खोसे,तालुकाध्यक्ष ज्योती खंदारे,शहर अध्यक्षा शाहीर मनियार व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड