August 9, 2025

मांजरा नदी उगम स्थान परिसरात झालेल्या जोरदार पावसाने नदीला पूर

  • कळंब ( माधवसिंग राजपूत ) – बीड व धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणारी व बीड जिल्हा पाटोदा तालुक्यात उगमस्थान असलेली मांजरा नदी ही प्रमुख नदी असून नदी पात्र परिसरात यंदाच्या पावसाळ्यात जोराचा पाऊस न झाल्याने नदीचे पात्र पूर्ण भरून एकदाही वाहिले नाही परंतु दिनांक १७ ऑगस्ट २०२४ रोजी नदी उगमस्थान असलेल्या पाटोदा तालुक्यात जोरदार मुसळधार पाऊस झाल्याने व नदीवरील या परिसरातील दोन धरणे पूर्ण भरल्याने नदीला पूर आला आहे. यामुळे पारगाव परिसरातील शेतीमध्ये पाणी पसरल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.या भागातील नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे परंतु पाटोदा तालुका वगळता पुढील नदीपात्र परिसरात गेल्या १५ दिवसापासून पावसाने दडी मारली असून हा परिसर कोरडा ठाक आहे व नदी पात्र मात्र भरून वाहू लागले आहे.यामुळे कळंब शहरातील नागरिकांना या पाण्याचे कौतुक वाटत आहे. कळंब शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर केज तालुक्यातील धनेगाव येथे मांजरा प्रकल्प आहे. या प्रकल्पातून लातूर शहर,लातूर एमआयडीसी,अंबाजोगाई, कळंब,केज,धारूर,मुरुड या गावाला पिण्यासाठी पाण्याचा पुरवठा केला जातो.यामुळे यावर्षी धरण भरेल का नाही याची काळजी नागरिकात असून प्रति वर्षा प्रमाणे परतीच्या पावसात धरण निश्चित भरेल अशी अपेक्षा नागरिकात आहे. यामुळे अचानक पाटोदा तालुक्यात झालेला पाऊस तसेच या परिसरातील असलेली दोन धरणे ओव्हर फ्लो झाल्याने पूर्ण क्षमतेने नदीपात्र वाहू लागले असून मांजरा धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे या परिसरातील शेतकरी व नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत व प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी व परिसरातील पाणी पातळीत वाढ होण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा मात्र कायम आहे.
error: Content is protected !!