कळंब – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे, महिला प्रदेशाध्यक्ष नामदार रूपालीताई चाकणकर यांच्या सूचनेनुसार कळंब शहरातील महिलांनी आदरणीय अजितदादांनी लाडकी बहीण योजनेतून आज प्रत्येक महिलेला तिच्या हक्काचे दीड हजार रुपये प्रमाणे दोन महिन्याचे तीन हजार रुपये तिच्या खात्यावरती रक्षाबंधनाची भावाकडून मिळालेली ही भेटमिळाली म्हणून पेढे वाटून आनंद व्यक्त करत एक बहिणीच्या नात्याने तिला देखील आपल्या भावासाठी आपली राखी भावाला पोहोचली पाहिजे या उद्देशाने अनेक महिला एकत्र येऊन प्रत्येकीने आपली राखी दादांना पाठवावी म्हणून हा राख्या एकत्र करून त्या दादांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत व आपल्या भावाला मनापासून त्यांच्या पुढील आयुष्यात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत अशा शुभ आशीर्वादाने हार्दिक शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या धाराशिव जिल्हा महिलाध्यक्ष सरला खोसे व इतर पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन