कळंब शहरात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या चौकाचे शुशोभिकरण करावे अशी मागणी धाराशिव-कळंब चे आमदार कैलास दादा घाडगे पाटील यांना निवेदन देऊन स्मारक समीतीच्या वतीने मागणी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सातासमुद्रापार आपल्या शाहिरीतुन सांगणारे,तथा फकीरा हि कादंबरी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीला अर्पण करणारे, महाराष्ट्रातुन मुंबई वेगळी होऊ नये या लढ्यातील लढवय्या म्हणजे जगविख्यात साहित्यीक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने गेल्या अनेक वर्षांपासून ढोकी रोड कळंब येथे चौकाची स्थापना करण्यात आली आहे परंतु सदरील चौकाकडे तालुक्यातील नेते मंडळींचे व समाज बांधवांचे म्हणावे तसे लक्ष नसल्याने येथील चौक अनेक वर्षापासून आहे त्याच स्थितीत आहे.त्यामुळे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चौकांचे सुशोभीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे चौकाच्या सुशोभीकरणासाठी धाराशिव-कळंब चे आमदार कैलास दादा पाटील यांची प्रत्यक्ष समारक समीतीच्या वतीने भेट घेऊन निवेदन दिले आहे.सदरील साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चौकाचे शुशोभिकरण लवकरात लवकर पूर्ण करुन देऊ असे समीतीला आमदार कैलास दादा घाडगे पाटील यांनी सांगितले.या निवेदनावर अण्णाभाऊ साठे चौक समीती कळंब अध्यक्ष रोहित कसबे, उपाध्यक्ष अविनाश वैरागे, सचिव धनंजय ताटे, कोषाध्यक्ष सनी कांबळे, प्रसिद्धी प्रमुख उमेश देडे, मार्गदर्शक भैय्यासाहेब खंडागळे, प्रमोद ताटे, लक्ष्मण झाडे, बंडु ताटे, नारायण ताटे, धनंजय आडसुळ, सीकंदर वैरागे, विकास गायकवाड, पांडुरंग कदम, आनंद कदम, बापू कसबे, गोविंद धडे, अमोल कुचेकर, करण ताटे,सचिन कुचेकर,करण कांबळे,प्रशांत भंडारे,अक्षय रणदिवे, बाबा शेळके, आकाश ताटे, महेश ताटे, दत्ता झोबांडे, सिधू खैरमोडे,सुरज गाडे, प्रकाश ताटे,अभिजित शिंदे,रोहण कसबे, अप्पा कांबळे, विशाल मीसाळ, यांच्या सह्या आहेत.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात