कळंब ( महेश फाटक ) – बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी कळंब शहरातून प्रकाशित होणाऱ्या सा.साक्षी पावनज्योतच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी शहरातील नगर परिषदेच्या समोरील मैदानात मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार राजू तापडियांच्या हस्ते संपन्न झाला. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न शासन दरबारी मांडून शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी २०१६ पासून परखड आणि निर्भीड मत व्यक्त करणारे अधिस्वीकृती धारक संपादक सुभाष घोडके यांच्या लेखणीतून परिपूर्ण साकारलेले सा.साक्षी पावनज्योतची वाटचाल ही ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडपणे चालू आहे. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे,ज्येष्ठ विधीज्ञ अँड.त्र्यंबक मनगिरे,मुख्य संपादक सुभाष द.घोडके,उपसंपादक माधवसिंग राजपूत,सूर्यकांत चव्हाण,विलास करंजकर,स्वप्नील लकडे,प्रा.श्रीकांत पवार,माजी सैनिक पुरी,डॉ.शंकर कांबळे,कालिदास अभंग,सुभेदार बी.शिंदे,कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके आदींची उपस्थिती होती.
** उपविभागीय अधिकारी कार्यालय – सा.साक्षी पावनज्योतचा वर्धापन दिन विशेषांक दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोरच्या प्रागणात उपजिल्हाधिकारी संजय पाटील,पोलीस उपअधीक्षक संजय पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक सानप,सहाय्यक निरीक्षक कांबळे,चाटे,आरपीआय खरात गट जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महावीर गायकवाड,समता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नवनाथ भंडारे,ज्ञानदा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष बंडू आबा ताटे,प्रकाश भंडगे,विलास मिटकरी,मुख्य संपादक सुभाष द. घोडके,लोजपा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड आदींची उपस्थिती होती.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात