August 9, 2025

कै.भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालयात बालहक्कविषयक जनजागृती

  • धाराशिव (जिमाका) – कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा येथील कै.भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालय येथे बालहक्कविषयक जनजागृती कार्यक्रमाचे 9 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले. यावेळी बालहक्क व मुलांच्या समस्या याबाबत चर्चा करण्यात आली. बालविवाहाविषयी माहिती देण्यात आली.बालकासंबंधीच्या विविध योजनांचे आणि चाइल्ड हेल्प लाईन १०९८ ची माहितीही यावेळी देण्यात आली आहे.
  • यावेळी चाइल्ड हेल्प लाईनचे सूपरवायझर अमर भोसले,पल्लवी कै.भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालयाचे मुख्यध्यापक सुरेश टेकाळे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.चाइल्ड हेल्प लाईन १०९८ जनजागृती उपक्रम जिल्हा महिला बाल विकास अधिकारी ए.बी.कांबळे,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ए.बी.कोवे व चाइल्ड हेल्प लाईन १०९८ चे प्रकल्प समन्वयक व्ही.पी.चव्हाण यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाला.
error: Content is protected !!