August 9, 2025

5 तालुक्यातील गोशाळांचे प्रस्ताव मागविले

  • धाराशिव (जिमाका) – गोवर्धन गोवंश सेवा केंद्र सुधारित योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये जिल्ह़यातील 5 तालुक्यातील गोशाळांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहे.
    धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, वाशी,लोहारा,कळंब आणि उमरगा या 5 तालुक्यातील गोशाळांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहे.या योजनेत पात्र ठरुन,राज्यस्तरावर प्रस्ताव मंजूर झालेल्या गोशाळांना गोवंश संख्येच्या आधारे,मार्गदर्शक सूचनांनुसार अनुदान दोन टप्प्यात मिळणार आहे. प्रस्तावांची छाननी जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तर अशी 3 स्तरावर होणार आहे.
    या 5 तालुक्यात असलेल्या गोशाळांनी त्यांचे प्रस्ताव त्यांची गोशाळा ज्या पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रात येते त्या संस्थेच्या संस्थाप्रमुख आणि संबंधित पशुधन विकास अधिकारी / सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन यांच्यामार्फत सादर करावे.
    अर्ज व विहीत प्रपत्र नमुने संबंधित सहाय्यक आयुक्त पशुसवंर्धन,तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकीत्सालय, संबंधित पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती यांचे कार्यालयामार्फत सादर करावयाचे आहेत.5 तालुक्यातील गोशाळा संचालकांनी त्यांचे प्रस्ताव 25 ऑगस्ट 2024 पुर्वी संबंधित तालुकास्तरीय संस्थांमार्फत जिल्हास्तरावर सादर करावेत.असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांनी केले आहे.
error: Content is protected !!