अर्ज करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांचे आवाहन
धाराशिव (जिमाका)- पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यावर्षी होणाऱ्या गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे.जिल्ह़यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने,स्पर्धेत सहभागी होण्यासाठी 31ऑगस्टपूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत सन २०२४ च्या गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये स्पर्धा घेऊन विजेत्या मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे.या स्पर्धेत सहभागी मंडळास अभिप्रायासह गुणांकन करुन प्रस्तावास शासनास सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. समिती गणेश मंडळाच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देणार आहे. जिल्हास्तरीय समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन देण्यात येणार आहे.तसेच गणेशोत्सव मंडळाची शिफारस करून त्यांची नावे,सर्व कागदपत्र व व्हीडीओसह राज्य समितीकडे सादर करण्यात येणार आहे.सार्वजनिक गणेश मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी,मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या इमेलवर अर्ज पाठवावेत. निकालासंदर्भात स्वतंत्र सूचना देण्यात येणार आहेत. जिल्हयातील सार्वजनिक गणेश मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी