August 9, 2025

रा.यु.काँ शहर सचिव पदी नितीन ठाणांबीर यांची निवड

  • कळंब – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण दि.१५ ऑक्टो २०२३ रोजी धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांच्याच अध्यक्षतेखाली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्ह्यानिहाय व तालुकानिहाय कार्यकारिणीची आढावा बैठक घेण्यात आली.
    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली व विकसनशील दृष्टिकोनाखाली आपण सर्वांनी कार्य केले पाहिजे.युवक म्हणून जबाबदारीने आपण समाजासमोर जाताना अजितदादांच्या विचाराने व कर्तृत्ववाचा ठसा जनसामान्यांपर्यंत पोचविला पाहिजे व आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात एक नंबरचा पक्ष झाला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केले. तसेच जिल्ह्यातील विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे यांनी जिल्ह्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वाधिक सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील असा विश्वास व्यक्त केला व आगामी काळात युवकांचा सर्वात मोठा मेळावा जिल्ह्यात होईल व युवक प्रवाहात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीन असे आश्वासन दिले.
    याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस धाराशिव
    राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कळंब शहर सचिव पदी नितीन ठाणांबीर यांची निवड करण्यात आली.
    याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष महेंद्र धायगुडे, युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे,कार्याध्यक्ष मनोज जगताप,प्रदेश सरचिटणीस शंतनू खंदारे, प्रदेश सरचिटणीस अमर पाटील,नागनाथ पाटील,कळंब तालुकाध्यक्ष अमर मडके आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!