भूम – पिरामल फाऊंडेशनच्या मार्गदर्शक तत्वानुसार जि.प. रामकुंड ता.भुम शाळेत दि.३० जुलै २०२४ रोजी लोकशाही पद्धतीने बालसंसद निवडणूक अतिशय उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांत लोकशाही मूल्यांची रुजवणूक व्हावी.मतदानाचा अधिकार कसा असतो याची माहिती होण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. इयत्ता पाचवीतील विद्यार्थी आकाश साबळे शाळेचा मुख्यमंत्री म्हणून विजयी झाला. उदया मंत्रीमंडळ विस्तार करण्यात येणार आहे. मतदान अधिकारी म्हणून इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगले कार्य पार पाडले. श्रीम.कुटे एम.सी., गायकवाड जे.एस., राठोड ए.एस. यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच पिरामल फाऊंडेशनच्या गांधी फेलो सदाफ व कोमल शर्मा यांनी विशेष परिश्रम घेतले.
More Stories
चिंचपूर येथे डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम
“परिवर्तन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ” पुरस्काराने कमलाकर शेवाळे सन्मानित
शिक्षणाचा प्रसार मराठवाड्यात करणारे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन