धाराशिव – डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात क्रांतिसिंह नाना पाटील जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा.डाॅ.प्रशांत दीक्षित यांचे मार्गदर्शनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जल व भूमी व्यवस्थापन विभागप्रमुख डाॅ.नितीन पाटील, कक्ष अधिकारी विद्याधर गुरव,वसंतरावजी काळे स्वाभिमान शिक्षण योजना समन्वयक डाॅ.गोविंद कोकणे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डाॅ.मेघश्याम पाटील, शिक्षणशास्त्र विभागातील डाॅ. महेश्वर कळलावे, वरिष्ठ ग्रंथालय सहाय्यक तुकाराम हराळकर, अभियंता प्रवीण आळंगे, वरिष्ठ सहाय्यक विश्वास कांबळे, श्रीकांत सोवितकर,शिवाजी माने, रवींद्र सोनवणे,संजय जाधव, धनराज सोमवंशी,एस.जी. राठोड,अशोक लोंढे,औदुंबर गाढवे,महेश कोकाटे,दशरथ कवडे,हेमंत रसाळ,सचिन रसाळ, सिद्धेश्वर नेटके,नागनाथ शिंदे, बालासाहेब वाघमारे,शिवदास वाघमारे, कुलकर्णी इ. उपस्थित होते.
More Stories
निवडणुकीत ७ लक्ष ४७ हजार ३७० मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कामगारांना ७ फेब्रुवारी रोजी भरपगारी रजा देणे बंधनकारक